जाहिरात पार्टी बातमी लागावी ही विनंती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील मौनीनगर साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप श्रीपती तिबिले यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी दत्तात्रय फराकटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी कागल निबंधक कार्यालयाचे लिपिक ए. एन. शिंदे होते.
यावेळी संचालिका वंदना बेलेकर, पद्मा भिऊंगडे, संचालक जगदीश पाटील, दत्तात्रय जरग, वसंतराव कोंडेकर, शिवाजी आबिटकर, मनोज केरकर, आनंदा पाटील, विठ्ठल साबळे, सुनील मिसाळ, आनंदा कांबळे यांच्यासह गटनेते भिमाजी परीट, पंढरीनाथ मुळीक, सुनील पिराले, विजय देवर्डेकर, संजय जरग, दत्तात्रय कलिगते, सुनील काळुगडे, टी. वाय. पाटील आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष तानाजी फराकटे यांनी आभार मानले.
........ फोटो २१ )संदीप तिबिले - गुलाबी फेटा.
२१ ) तानाजी फराकटे. - केशरी फेटा .