शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भोगावतीचा कारभार -राजीनामा मागे हाच पी.एन. यांच्यासमोर पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:02 IST

bhogawati, sugerfactory, kolhapur, mla, pnpatil परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी राजीनामा मागे घेवून कारखान्याची सुत्रे सांभाळणे हाच सद्यस्थितीत त्यांच्यासमोरील एकमेव पर्याय आहे. अन्यथा कारखान्यासमोरील अडचणीत वाढतील अशी स्थिती आहे. त्यामुळे ते राजीनामा मागे घेण्याचीच शक्यता बुधवारी ठळ‌क झाली.

ठळक मुद्देराजीनामा मागे हाच पी.एन. यांच्यासमोर पर्याय भोगावतीचा कारभार अन्यथा कारखान्यासमोरील अडचणीत वाढ

कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी राजीनामा मागे घेवून कारखान्याची सुत्रे सांभाळणे हाच सद्यस्थितीत त्यांच्यासमोरील एकमेव पर्याय आहे. अन्यथा कारखान्यासमोरील अडचणीत वाढतील अशी स्थिती आहे. त्यामुळे ते राजीनामा मागे घेण्याचीच शक्यता बुधवारी ठळ‌क झाली.कारखान्याच्या व्यापातून अन्य सहकारी संस्था व मतदार संघातील कामांकडे वेळ देता येत नसल्याने आमदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली. कारखान्याचा हंगाम मंगळवारपासूनच सुरु झाला आहे. त्या तोंडावर राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने सगळेच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे सत्तारुढ आघा़डीतील सर्व २२ संचालकांनी तुम्ही राजीनामा मागे घेणार नसाल तर आमचेही राजीनामे घ्या म्हणून सर्वांनी आमदार पाटील यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

कार्यकारी संचालकांनीही राजीनामा दिला आहे. हे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविले तर कारखान्यांवर प्रशासक येवू शकतो. तसे व्हायचे नसेल तर आमदार पाटील यांनी राजीनामा मागे घेण्याशिवाय गत्यंतर नाही. कारखान्याची सुत्रे त्यांच्याकडे असल्याने जिल्हा बँकेकडून कारखान्यास भरीव सहकार्य मिळाले आहे. अन्य अनेक कामांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची कारखान्याचे प्रश्र्न सुटण्यास मदत होत आहे.

सुमारे पंचवीस वर्षे ते कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व करत आहेत परंतू ते कधीच प्रत्यक्ष निवडणूकीस उभे राहिलेले नव्हते. गतनिवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहिले. कारखान्याच्या कारभारात ते स्वत: भाग घेणार असल्यानेच सभासदांनी त्यावर विश्र्वास ठेवून काँग्रेसचे पॅनेल विजयी केले. असे असताना मध्येच त्यांनी राजीनामा दिल्यास कारखान्याची घडी विस्कळीत होवू शकते याचा विचार करून त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागेल असेच सद्याचे चित्र आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMLAआमदारkolhapurकोल्हापूर