शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

यूएसआयतर्फे ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’साठी संभाजीराजेंना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:57 IST

यूएसआय ही देशातील सर्वात जुनी लष्करी थिंक-टँक संस्था

कोल्हापूर : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांना येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’साठी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (यूएसआय)तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.१८७० मध्ये स्थापन झालेली यूएसआय ही देशातील सर्वात जुनी लष्करी थिंक-टँक संस्था आहे. त्यांच्या सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी विभागाचे संचालक स्क्वॉड्रन लीडर राणा टी. एस. चिन्ना आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अर्चना त्यागी यांची नवी दिल्लीत संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय लष्करी, तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुनरुत्थान करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण आणि सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी यांच्यात पुढील काळात संयुक्तरित्या काम करण्याबाबत चर्चा झाली. विशेषत: दुर्गराज रायगड व परिसरातील ऐतिहासिक लष्करी वारसा व्यवस्थापन धोरण, पर्यटन विकास व शाश्वतता, जैवविविधता संरक्षण, पर्यटन अर्थशास्त्र, तसेच स्थानिक रोजगार निर्मिती अशा विविध अंगांनी दोन्ही संस्था एकत्रितरीत्या कार्य करु शकतात, याबाबत चर्चा झाली. या बैठकीला प्राधिकरणाचे तज्ज्ञ सल्लागार ए. के. सिन्हा, रामनाथन, वास्तू संवर्धक वरुण भामरे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Raje Invited to Indian Military Heritage Festival by USI

Web Summary : Sambhaji Raje Chhatrapati is invited to Delhi's 'Indian Military Heritage Festival' by the United Service Institution of India (USI). Discussions included preserving Shivaji Maharaj's military and cultural heritage, focusing on Raigad's historical military legacy, tourism, and local job creation. Collaborative efforts between USI and the Raigad Development Authority are planned.