शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

Kolhapur: नव्या वर्षात संभाजीनगर एसटी स्टँड येणार सेवेत - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:39 IST

स्थानकाचा छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव

कोल्हापूर : उपनगरातील प्रवाशांच्या सोयीकरिता आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेले संभाजीनगर बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून नव्या वर्षात ते प्रवाशांच्या सेवेत सज्ज होईल. असा विश्वास माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.बुधवारी आमदार पाटील यांनी संभाजीनगर बसस्थानकास भेट देऊन कामाची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, संभाजीनगर आगाराचे प्रमुख शिवराज जाधव, विभाग अभियंता मनोज लिंग्रस उपस्थित होते.पाटील म्हणाले, मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांचा भार कमी व्हावा. उपगनगरातील प्रवाशांना राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आणि कोकण, पुणे, मुंबई आदी ठिकाणी जाण्यास सुलभ व्हावे. या उद्देशाने संभाजीनगर बस स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी ९ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. संभाजीनगर स्थानकाचे इमारतीसह अंतर्गत काम पूर्णत्वाकडे आले आहे. केवळ किरकोळ कामे शिल्लक आहेत.त्यानंतर नव्या वर्षात अर्थात जानेवारी महिन्यात बस स्थानकातून या मार्गावर एस.टी. बस सोडल्या जातील. सध्या या स्थानकातून टचिंग पाॅइंट म्हणजेच येथून मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांना नेण्याची सोय केली आहे. कोल्हापूरकरांची भावना विचारात घेता बसस्थानकाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर बसस्थानक करण्यासाठी मागणीचे पत्र एस.टी. महामंडळास देऊन त्याचा पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग, संजय मोहिते, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, सुयोग मगदूम आदी उपस्थित होते.

नामकरणाचा प्रस्तावएसटीच्या कोल्हापूर विभागात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकानंतर संभाजीनगर बसस्थानकाचा समावेश आहे. या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. ती मिळाल्यानंतर नावातही बदल होणार आहे. यासाठी माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी महामंडळास पत्र देणार आहे, तर कार्यालयीन प्रस्ताव विभाग नियंत्रक अनघा बारटक्के देणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील