पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान-- संभाजीराजे यांनी घेतली केद्रीय कृषिमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:52 PM2019-11-22T12:52:24+5:302019-11-22T12:54:49+5:30

भरीस भर म्हणून अनेक विमा कंपन्याही शेतक-यांना त्रास देत आहेत. काही वर्षांत दहा हजार कोटी रुपयांचा नफा कमणा-या विमा कंपन्या यंदा मात्र निविदांमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. शेतकरी आणि सरकार यांच्या हातावर या कंपन्यांनी तुरी दिली आहे.

Sambhaji Raje's visit to Central Agriculture Minister | पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान-- संभाजीराजे यांनी घेतली केद्रीय कृषिमंत्र्यांची भेट

खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकºयांच्या प्रश्नांची मांडणी केली.

googlenewsNext
ठळक मुद्दे काही वर्षांत दहा हजार कोटी रुपयांचा नफा कमणा-या विमा कंपन्या यंदा मात्र निविदांमध्ये सहभागी झालेल्या नाहीत.

कोल्हापूर : महापूर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवसाला किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर या विषयात हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंती गुरुवारी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना केली.

संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत तोमर यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आधी दुष्काळ, नंतर महापूर आणि नंतर परतीच्या पावसाचा तडाखा; यामुळे शेतक-यांच्या हातातील पिके गेली असून त्यांचे कंबरडेच मोडले आहे. भरीस भर म्हणून अनेक विमा कंपन्याही शेतक-यांना त्रास देत आहेत. काही वर्षांत दहा हजार कोटी रुपयांचा नफा कमणा-या विमा कंपन्या यंदा मात्र निविदांमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. शेतकरी आणि सरकार यांच्या हातावर या कंपन्यांनी तुरी दिली आहे.

याबाबत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आश्चर्य व्यक्त करीत तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेणार असल्याचे सांगून महाराष्ट्रातील शेतकºयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 

 

Web Title: Sambhaji Raje's visit to Central Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.