शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:03 IST

हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार समरजित घाटगे हे पुन्हा स्वगृही दाखल होण्याची चर्चा भाजपमध्ये वेगाने सुरू आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाला असून, लवकरच प्रवेश होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेला पराभव झाला होता. त्याआधी घाटगे केवळ भाजपमध्येच होते असे नव्हे, तर ते वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्षही होते. त्या काळात केंद्र आणि राज्य शासनातील अनेक मान्यवर मंत्र्यांनी घाटगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिल्या होत्या. परंतु, दीड वर्षापूर्वी अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाले. आमदारांना विधानसभेसाठी प्राधान्य देण्याचे ठरल्यानंतर मुश्रीफ हेच कागलचे उमेदवार असणार हे निश्चित होते. त्यामुळेच घाटगे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशाचा जंगी कार्यक्रमही कागलमध्ये पवार यांच्या उपस्थितीत झाला. पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी कागलमध्ये जाहीर सभा घेऊन मुश्रीफ यांना पाडा असे केलेले वक्तव्य राज्यभर गाजले. परंतु, तरीही मुश्रीफ विजयी झाले आणि घाटगे काय करणार अशी चर्चा सुरू झाली.           दरम्यान, पंधरवड्यापूर्वी पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमवेत दोन, तीन ठिकाणी समरजित कार्यक्रमात होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत अशी अटकळ बांधली जाऊ लागली. परंतु, गेल्या आठवड्याभरात समरजित यांच्या भाजप प्रवेशाचा विषय पुढे गेल्याचे सांगण्यात आले.

बाबांचा रूमालविधानसभा निवडणूक झाल्या झाल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि प्रवेशाविषयी चर्चा केली. संजयबाबा यांची भाजप प्रवेशाची खेळी म्हणजे समरजित यांच्याआधी रूमाल टाकण्याचा प्रकार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. परंतु, वेळ पडल्यास दोन्ही घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो असे सांगण्यात येते. समरजित यांचे भाजपचे दरवाजे बंद करण्यासाठीच संजयबाबा यांचा भाजपप्रवेश अगोदर व्हावा अशा हालचाली कागलातूनच सुरू होत्या.

सहकार समूहाला प्राधान्यसमरजित हे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांची शिक्षण संस्था, बँक आहे. या पार्श्वभूमीवर हा संस्था समूह सांभाळताना केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधी भूमिका घेणे फारसे हिताचे नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ते पुन्हा भाजपचे गीत गातील असे सांगण्यात येते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेBJPभाजपा