दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:17 PM2020-11-04T17:17:38+5:302020-11-04T17:20:16+5:30

Diwali, zp, Divyang, kolhapur कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तुंची जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर प्रदर्शन व विक्री  होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

Sale of items made by Divyang students from 9th to 11th November in 'ZP' | दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्री

दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्रीवस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्या-मित्तल यांनी केले आवाहन

कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्यादिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तुंची जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर प्रदर्शन व विक्री  होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणपणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे मित्तल म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण 23 दिव्यांग शाळांपैकी 7 कार्यशाळा आहेत असे सांगून जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, कार्यशाळेतील 18 वर्षापुढील विद्यार्थी विविध वस्तू तयार करतात. कार्यालयीन फाईल, राख्या, दिवाळीचे साहित्य बनवत असतात. दिवाळीसाठी यावर्षी आकर्षक आकाशदिवे, नक्षीदार पणत्या, उटणं, भेटवस्तू या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. याचे प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसात करण्यात येणार आहे. या वस्तू नक्की विकत घ्या आणि त्यांच्या कलेला दाद द्या, असेही श्री. घाटे म्हणाले.

Web Title: Sale of items made by Divyang students from 9th to 11th November in 'ZP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.