‘सखी मंच’ सदस्यांना मिळणार ‘डान्स अँड फिटनेस’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST2021-02-12T04:22:07+5:302021-02-12T04:22:07+5:30

‘लोकमत सखी मंच’ आणि कोल्हापुरातील व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या शिबिरात फिटेनसमध्ये मसल्स स्ट्रेंथ, फेक्झिबिलिटी, वेटलॉस, तर ...

Sakhi Manch members will get Dance and Fitness lessons | ‘सखी मंच’ सदस्यांना मिळणार ‘डान्स अँड फिटनेस’चे धडे

‘सखी मंच’ सदस्यांना मिळणार ‘डान्स अँड फिटनेस’चे धडे

‘लोकमत सखी मंच’ आणि कोल्हापुरातील व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या शिबिरात फिटेनसमध्ये मसल्स स्ट्रेंथ, फेक्झिबिलिटी, वेटलॉस, तर डान्समध्ये फ्री-स्टाईल, जॅज, सोलो आणि ग्रुप या प्रकारात प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरिओग्राफर नितीन पाटील, विठ्ठल पाटील आणि ओंकार शेटे हे प्रशिक्षण देतील. राजारामपुरी नववी गल्लीतील आरबीएल बँकेजवळील व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंट येथे शिबिर होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी बारा, दुपारी बारा ते एक, दुपारी चार ते सायंकाळी पाच आणि सायंकाळी पाच ते सहा अशा चार बॅचेसमध्ये शिबिर होईल. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कोरोनाबाबतच्या शासननियमांचे पालन करून शिबिर होणार आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी (७२४८९४०८०९/९७६७२६४८८५) या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)

Web Title: Sakhi Manch members will get Dance and Fitness lessons