शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोमवारनिमित्त सजली महादेव मंदिरे

By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST

शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई : विविध कार्यक्रमांचे आयोजन

करवीरनगरीत सुमारे तीनशेहून अधिक शंकरांची मंदिरे आहेत. त्यामध्ये बऱ्याच मंदिरांचा ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथात उल्लेख आहे; परंतु काही नव्याने त्या जुन्या मंदिरांच्या प्रतिकृती उभ्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ कावळा नाका परिसरातील वटेश्वर महादेव मंदिर हे होय. श्रावण सोमवारनिमित्त पहाटे तीन वाजता लघुरुद्राभिषेक, आरती, त्यानंतर भक्तांना बुंदी वाटप व रात्री साडेसात वाजता भजन होणार असल्याचे पुजाऱ्यांनी यावेळी सांगितले.पद्माळ्याच्या काठावर श्री नरसिंह, कात्यायनीजवळ परशुराम आणि गोकुळ शिरगाव क्षेत्री श्रीकृष्ण अशा या अवतार परंपरेत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रानी आपल्या पदस्पर्शांने पावन केलेले क्षेत्र म्हणजे श्रीरावणेश्वर मंदिर. मंदिरात पहाटे रुद्र एकादशीने सुरुवात होऊन भक्तांना दूध वाटप करण्यात येईल. दुपारी चार ते सहा यावेळेत प्रवचनकार प्रसन्न मालेकर यांचे ‘महादेव महिमा’ या विषयावर प्रवचन होणार आहे. सायंकाळी वडणगेतील प्रल्हाद पाटील, विक्रम पाटील यांचे भावगीत, भक्तिगीत सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक शशिकांत मुछंडी यांनी सांगितले.पुरातन काळातील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. श्रावण सोमवारी पहाटे अभिषेक, मंत्रपठण व रात्री उत्तरेश्वर प्रासादिक महादेव भजनी मंडळाचे भजन रात्री दहा वाजता होणार आहे. तिसऱ्या सोमवारी महापूजा व सत्यनारायण पूजा पहाटे होणार आहे.कपिलतीर्थ मार्केटमधील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराची ग्रामदैवत म्हणून तसेच पुरातन मंदिर म्हणून ओळख आहे. या मंदिर परिसरात पूर्वी पाण्याचे तळे होते. १६६४ मधील हे मंदिर आहे. आठ पिढ्यांपासून या मंदिराची वहिवाट धर्माधिकारी कुटुंबीयांकडे आहे. श्रावणनिमित्त मंदिरात अभिषेक होईल, असे मंदिराचे पुजारी गिरिजा धर्माधिकारी यांनी सांगितले.