किल्ले बनवा स्पर्धेत साई गणेश, ज्युनिअर बॉईज, सिध्दीविनायक ग्रुप विजेते - पारितोषिक वितरण उत्साहात : लोकमत बालविकास मंच व के. जे. ग्रूपचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:20+5:302021-01-04T04:20:20+5:30
कोल्हापूर : दिवाळीनिमित्त लोकमत बाल विकास मंच व करण दीपक जाधव (के. जे.) ग्रुप, राजारामपुरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन ...

किल्ले बनवा स्पर्धेत साई गणेश, ज्युनिअर बॉईज, सिध्दीविनायक ग्रुप विजेते - पारितोषिक वितरण उत्साहात : लोकमत बालविकास मंच व के. जे. ग्रूपचे आयोजन
कोल्हापूर : दिवाळीनिमित्त लोकमत बाल विकास मंच व करण दीपक जाधव (के. जे.) ग्रुप, राजारामपुरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन किल्ले बनवा’ स्पर्धेत साई गणेश मित्रमंडळ, ज्युनिअर बॉईज काशीद कॉलनी, सिद्धीविनायक ग्रुपचा बालचमू विजयी ठरले. त्यांना करण दीपक जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
‘लोकमत’च्या येथील शहर कार्यालयात हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. दिवाळी हा शब्द उच्चारताच फटाके, फराळ यासोबतच किल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर येते. दिवाळीच्या आधी आठ दिवसांपासूनच घराच्या दारात दगड, विटा, माती, गोणपाट असे साहित्य रचून किल्ले बनवायला सुरुवात होते. सगळे मिळून वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारतात. बालचमूच्या या सृजनशीलतेला वाव मिळावा, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मुलांना अभ्यासता यावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहभागी मुलांनी पन्हाळगड, प्रतापगड, रायगड अशा वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवली होती. शिवाय ती पोस्ट करताना त्या किल्ल्यांचा इतिहासदेखील लिहिला होता. तसेच तयार किल्ल्यांचे फोटो ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले. पेजवरील पोस्टला मिळालेले लाईक्स आणि परीक्षण या माध्यमातून विजेते संघ निवडण्यात आले.
---
फोटो नं ०३०१२०२१-कोल-किल्ले बनवा स्पर्धा
ओळ : दिवाळीनिमित्त लोकमत बाल विकास मंच व करण दीपक जाधव (के. जे) ग्रुप, राजारामपुरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन किल्ले बनवा’ स्पर्धेतील विजेत्या संघांना रविवारी करण दीपक जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
--
बालमंचचा लोगो वापरावा
--