शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:33 IST

वडिलांच्या स्मरणार्थ पाच गुंठे क्षेत्र एकटी संस्थेला दान

कोल्हापूर : भारतरत्न रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी समाजासाठी काय-काय केले, हे वाचून त्यांच्याही मनात आपणही काही समाजाचे ऋण फेडावे, अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी निर्णय घेतला. वडणगे-निगवे (ता. करवीर) रस्त्यावरील सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा ५ गुंठे भूखंड एकटी संस्थेला दान केला. त्या जागेवर असलेल्या खोल्यांचा किल्ल्याच त्यांनी सोमवारी अवनी संस्थेकडे सुपूर्द केल्या. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे सागर रंगराव पाटील. नववर्षात आपण हे करू, ते करू असा अनेकजण पण करतात, परंतु त्यांनी जे मनात आले ते करून कोल्हापूरच्या मातीची दातृत्वाची भावना जोपासली.सागर पाटील हे शाहुपुरीत राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. हा भूखंडही त्यांच्या वडिलांनीच घेतला होता. आपण शहरात राहतो. या भूखंडाचा आता तसा आपल्याला फारसा काही उपयोग नाही, तो चांगल्या कामासाठी द्यावा, असा विचार त्यांनी केला. सख्ख्या भावासाठीही गुंठाभर जमीन सोडताना वाद घालणारा समाज सगळीकडे असताना, त्यांनी मात्र क्षणाचाही विलंब न लावता भूखंड देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी स्वत:हून अवनी संस्थेशी जेव्हा संपर्क साधला, तेव्हा संस्थेलाही क्षणभर त्यावर विश्वासच बसला नाही. आम्हाला आई-वडिलांनी सगळे भरभरून दिले, म्हणून त्यातीलच मूठभर आम्ही समाजासाठी देत असल्याची त्यांची भावना आहे. समाजात अशी माणसे आहेत, म्हणूनच हा गाडा पुढे चालतो आहे. ते म्हणतात, पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षाही आयुष्यात गोरगरिबांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. मृत्यूनंतरही तुमचे कार्य चिरस्मरण राहण्यासाठी गोरगरीब, निराधार लोकांसाठी मदत केली पाहिजे.एकटी संस्थेचे सामाजिक कार्य पाहून सागर पाटील यांनी हा भूखंड दिला. वडील रंगराव यांना ते अण्णा म्हणत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे दान केले. एकटी संस्था तिथे ‘अण्णामाई सेवासदन’ सुरू करणार आहे. जागेच्या उद्घाटन सोहळ्यास गीतादेवी रंगराव पाटील प्रमुख उपस्थित होत्या. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.सरपंच पाटील म्हणाल्या, समाजातील माणुसकी हरवत चालली असता, सागर पाटील यांनी केलेले काम आदर्शवत आहे. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, या जागेत आम्ही बेघर वृद्धांसाठी मोफत निवारा करत आहोत. डॉ. अजित देवणे यांनी ‘अण्णामाई सेवासदन’मधील लोकांच्या औषध उपचाराचा खर्च मोफत करणार असल्याचे सांगितले.या वेळी डॉ. अमरसिंह रजपूत, एकटी संस्थेचे सल्लागार जैनुद्दीन पन्हाळकर, तलाठी प्रकाश महाडेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. इकबाल रेठरेकर, अक्षय पाटील, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, जगदीश कांबळे, सविता कांबळे, अभिजीत कांबळे, पवन कदम, शुभम कामत, अर्चना गाडी, कार्तिकी निगवेकर, निकीता राजपूत आदींनी संयोजन केले. सुरेखा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर