भोगावती : शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रचारासाठी जाणाऱ्या मद्यधुंद युवा कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या अनेक दुचाकींना चारचाकी गाडीने धडक दिली. यावेळी सुदैवाने या अपघातातून एक लहान मुलगी बचावली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सडोली खालसा, ता. करवीर येथील या युवा नेत्याची राशिवडे गावातील युवकांनी धुलाई केली. कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे. त्यासाठी एका पॅनेलच्या प्रचार दौऱ्यासाठी जाताना या नेत्याने शिवडे बाजारपेठेत एका गिफ्ट दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला ठोकरले. त्यामुळे मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. मात्र दैव बलवत्तर म्हणूनच एक लहान मुलगी या अपघातातून बचावली. याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती.
Kolhapur: सडोलीच्या युवा नेत्याची राशिवडेत धुलाई, मद्यधुंद अवस्थेत कारने दुचाकींना दिलेल्या धडकेत चिमुकली बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:32 IST