शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सचिन सावंत यांची केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकीसाठी धडपड  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:11 IST

chandrakant patil Politicis : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्या वेळी झोपा काढत होता काय? अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देसचिन सावंत यांची केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकीसाठी धडपड :चंद्रकांत पाटीलराज्य सरकारने आता तरी मागासवर्गीय आयोग स्थापन करावा

कोल्हापूर : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्या वेळी झोपा काढत होता काय? अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.येथील सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी मराठा समाजाचा मंडल आयोगामध्ये का समावेश केला नाही. एखादा समाज, जात मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार हा राज्याला असल्याचे १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सिध्द होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीचे सरकारने अद्याप मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. आता, तरी सरकारने हा आयोग स्थापन करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.कसली वाट पाहत आहात?राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही, मागासवर्गीय आयोगाची स्थापना, पुनर्विचार याचिका दाखल करणे, आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी सेवेत रूजू करून घेण्याबाबत कसली, कोणती वाट पाहत आहात, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

मी अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळे निर्णय घ्यायला किती वेळ लागतो हे मला माहीत आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची हिंमत नसल्याचे दिसते. हिंमत असेल तर या अधिवेशनाची तारीख सरकारने जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSachin sawantसचिन सावंतkolhapurकोल्हापूर