सचिन चव्हाण, सूर्यवंशींनी नेले अर्ज

By Admin | Updated: August 9, 2015 01:44 IST2015-08-09T01:44:21+5:302015-08-09T01:44:21+5:30

महापालिका निवडणूक : काँग्रेससाठी पहिल्याच दिवशी ३० इच्छुक

Sachin Chavan, Suryavanshi took the application | सचिन चव्हाण, सूर्यवंशींनी नेले अर्ज

सचिन चव्हाण, सूर्यवंशींनी नेले अर्ज

कोल्हापूर : कॉँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या ३० कार्यकर्त्यांनी शनिवारी पक्षाची उमेदवारी मागणी अर्ज नेले. माजी स्थायी सभापती सचिन चव्हाण, त्यांच्या पत्नी जयश्री चव्हाण यांच्यासह मीना व नंदकुमार सूर्यवंशी आदींचा त्यामध्ये समावेश आहे. दहा रुपये अर्जाची किंमत आहे.
अर्ज नेणाऱ्या प्रमुख इच्छुकांची नावे अशी : महंमद सनदी (राजारामपुरी), हेमा सुनील पाटील (पांजरपोळ), वृंदा मुकुंद काळोलीकर (साळोखेनगर), अनिल शिंदे (टेंबलाईवाडी), विद्या लकडे, अरुण खोडवे व गायत्री अमर माने (तिन्ही कॉमर्स कॉलेज), लईक पिरजादे (सिद्धार्थनगर), शिवप्रसाद घोडके व आनंदराव गजगेश्वर (दोघेही रामानंदनगर-जरगनगर) व सुनीता चंद्रकांत हवालदार (शुगर मिल).
ज्या उमेदवारांना कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढायची आहे, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी ३० जणांनी उमेदवारी अर्ज नेले. पक्ष कार्यालयाकडे उमेदवारी मागणी अर्ज येतील त्यातूनच उमेदवारांना तिकिटे देण्यात येणार आहेत. आधी कोल्हापुरात स्थानिक नेते अर्जांची छाननी करणार असून, अंतिम निवड प्रदेश कॉँग्रेस पक्ष कार्यालयाकडून होणार आहे.
 

Web Title: Sachin Chavan, Suryavanshi took the application