एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली

By Admin | Updated: May 13, 2014 00:49 IST2014-05-13T00:49:52+5:302014-05-13T00:49:52+5:30

ए. डी. चौगले यांची पोलिसांत तक्रार : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे राजकारण

S. S. Patil organized an illegal election | एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली

एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली

कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीररीत्या संस्थेची निवडणूक लावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अगर सभा बोलावण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ कारखान्याच्या संचालकांना मदत करण्यासाठी संगनमताने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ए. डी. चौगले यांनी करवीर पोलिसांकडे आज (सोमवार) केली. भोगावती शिक्षण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार भोगावती कारखान्याचे चेअरमन हे शिक्षण मंडळाचे पदसिद्ध सदस्य, तर कार्यकारी संचालक हे प्रधान सचिव असतात. यामध्ये राष्टÑवादी कॉँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने एकत्रित येत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर कॉँग्रेसने ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचे सांगत अलिप्त राहणे पसंत केले आहे. १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, आज चौगले यांनी प्रधान सचिव एस. एस. पाटील यांच्याविरोधात करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थेची २३ मार्चला सर्वसाधारण सभा होऊन त्यामध्ये २०१४ ते २०१९ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड होऊन या कार्यकारी मंडळ निवडीबाबतचा मुंबई विश्वस्थ कायद्याप्रमाणे उपधर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात द्यावा लागणारा बदल अर्जही संस्थेने दाखल केला आहे. निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ हे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत आहेत, पण एस. एस. पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम लावला आहे. ही फसवणूक असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चौगले यांनी पोलिसांत केली आहे.

Web Title: S. S. Patil organized an illegal election