शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. भाडे व खोळंबा आकारात सवलत द्या  : राजेश क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:47 IST

श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित देवोल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्दे सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. भाडे व खोळंबा आकारात सवलत द्या : क्षीरसागर मागण्यांचे निवेदन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित देवोल यांच्याकडे सादर

कोल्हापूर : श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित देवोल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, यंदा रेणुका भक्त संघटनांनी कर्नाटक एस. टी.ला विरोध करून, महाराष्ट्र एस. टी. प्रासंगिक कराराद्वारे घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने डिसेंबरमधील सौंदत्ती यात्रेला भाविकांची पसंती एस. टी. बसेसना असणार आहे. यात्रेसाठी शहरातून १६५ एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात.

गतवर्षी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या वतीने गतवर्षी सौंदत्ती यात्रेकरिता ३८० कि. मी. करिता प्रतिकिलोमीटर ५० वरून ३४ रुपये करण्यात आला होता. त्याचबरोबर ताशी ९८ रुपयेप्रमाणे ७२ तासांचा खोळंबा आकार १० करण्यात आला होता; त्यामुळे भाविकांची ३३ लाख ६९ हजार ९६० रुपयांची बचत झाली.

यंदादेखील याचप्रमाणे विशेष सवलत देण्यात यावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावर देवोल यांनी याबाबत एस. टी. महामंडळ सकारात्मक असून, येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन संबंधितांना सूचना देऊ, अशी ग्वाही दिली.

 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर