शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीजवळ तवंदी घाटात भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन ठार, तेरा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:03 IST

निपाणी (जि. बेळगाव) : भरधाव कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची ...

निपाणी (जि. बेळगाव) : भरधाव कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथील तवंदी घाट येथे घडली. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल अमर येथे झाला. जखमी पट्टणकडोली, निपाणी, गडहिंग्लज, हुबळी, सातारा येथील रहिवासी आहेत.या अपघातात जबीन महंमदहुसेन मकानदार (वय ५८ रा. निपाणी) व शिक्षक संतोष गणपती माने (वय ५०, रा. खडकलाट) हे जागीच ठार झाले, तर दिलदार मुल्ला व रेखा गाडीवड्डर गंभीर जखमी असल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.जितेंद्र मोहिते हा हुबळी येथून कराडकडे मालवाहतूक ट्रकने जात होता. हॉटेल व्हाइट हाऊस नजीक आला असता, चालक जितेंद्र याचा ट्रकवरील ताबा सुटला. याच वेळी संतोष माने हे रेखा गाडीवड्डर यांना संकेश्वरकडे दूचाकीवरून घेऊन जात होते. याचवेळी ट्रकने विरोधी बाजूला येऊन माने यांच्या दुचाकीला धडक दिली. यामधे माने यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा ट्रकने कंटेनर, आयशर या दोन वाहनांना धडक दिली. त्याचबरोबर पट्टणकोडोलीच्या दिशेने जाणाऱ्या कारवर ट्रक आढळला. यामध्ये कारमधील जबीन मकानदार यांचा जागीच मृत्यू झाला तर दिलदार मुल्ला, परविन मुल्ला व नुसरा मुल्ला, साफिया मुुल्ला हे चौघे जखमी झाले. दरम्यान, याच ट्रकने हुबळीतून साताराकडे जाणाऱ्या कारलाही जोराची धडक दिली. यामध्ये मंजुनाथ तेंडुलकर, सुपर्णा नेगलुर व श्रेया नेगलुर हे जखमी झाले. ट्रकने धडक दिलेल्या आयशर व कंटेनरमधील चालक जखमी झाले. या अपघातानंतर बेळगाव कोल्हापूरकडे होणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकAccidentअपघातDeathमृत्यू