कोल्हापूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राजारामपुरी शाखेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:09 IST2017-10-16T18:05:32+5:302017-10-16T18:09:25+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राजारामपुरी शाखेच्या दारात सोमवारी सकाळपासून पेन्शनधारकांची एकच गर्दी झाली होती. दोन दिवसांची सुटी व त्यात सुमारे चारशे ते पाचशे लाभार्थी पेन्शनसाठी आल्याने गर्दी उडाली.

The rush at Rajarampuri branch of Kolhapur district central co-operative bank | कोल्हापूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राजारामपुरी शाखेत गर्दी

जिल्हा बॅँकेच्या राजारामपुरी शाखेच्या दारात सोमवारी सकाळी पेन्शनधारकांनी अशी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपेन्शनसाठी सकाळी साडेनऊपासून लाभार्थ्यांचा ठिय्यासुमारे चारशे ते पाचशे लाभार्थी पेन्शनसाठी आल्याने गर्दी

कोल्हापूर , दि. १६ :   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राजारामपुरी शाखेच्या दारात सोमवारी सकाळपासून पेन्शनधारकांची एकच गर्दी झाली होती. दोन दिवसांची सुटी व त्यात सुमारे चारशे ते पाचशे लाभार्थी पेन्शनसाठी आल्याने गर्दी उडाली.


राजारामपुरी शाखेत संजय गांधी निराधार पेन्शनसह विविध पेन्शन योजनांचे पैसे जमा होतात. शाखेत पेन्शनची १६०० खाती आहेत. त्याचबरोबर इतर खातेदारही मोठ्या प्रमाणात आहेत.

दिवाळी असल्याने शासनाने पेन्शनचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. त्यात शनिवार व रविवार दोन दिवस बॅँकेला सुटी असल्याने सोमवारी ग्राहकांनी बॅँकेत गर्दी केली होती. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लाभार्थ्यांच्या रांगा बॅँकेच्या दारात उभ्या होत्या. साधारणत: दुपारी दोनपर्यंत गर्दी कायम होती.

 

पेन्शनची खाती १६०० आहेत. त्यातील बहुतांशी पेन्शनर एकदम आल्याने गर्दी झाली. प्रत्येक महिन्याला अशी गर्दी होते.
- आर. बी. पाटील ( शाखा व्यवस्थापक, जिल्हा बॅॅँक)
 

Web Title: The rush at Rajarampuri branch of Kolhapur district central co-operative bank