शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

दिवसाला सव्वातीनशेवर मोडतात वाहतुकीचा नियम, कोल्हापुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:28 IST

traffic police kolhapur- कोल्हापूर शहरात दिवसाला तीनशेहून अधिक जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यातील बहुतांश लोक वाहन परवाना नसताना वाहन चालवत असल्याचे दिसते.

ठळक मुद्दे दिवसाला सव्वातीनशेवर मोडतात वाहतुकीचा नियम, कोल्हापुरातील चित्रवर्षात ९१ लाखांचा दंड वसूल : लायसेन्स नसणाऱ्यांचे प्रमाण जास्त

सचिन भोसलेकोल्हापूर : कोल्हापूर शहरात दिवसाला तीनशेहून अधिक जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यातील बहुतांश लोक वाहन परवाना नसताना वाहन चालवत असल्याचे दिसते.

गेल्या वर्षभरात शहर वाहतूक शाखेने नियम न पाळणाऱ्यांकडून १ लाख १२ हजार जणांना २ कोटी ३३ लाख दंडाची नोटीस बजावली. मात्र, त्यापैकी ४३ हजार जणांनी ९१ लाख रुपयांची तडजोड शुल्क भरले. उर्वरित ६९ हजार जणांकडून १ कोटी ४२ लाख दंड प्रलंबित आहे.गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना नसलेले, रहदारीस अडथळा ठरणारी वाहने, दोनपेक्षा अधिक जण वाहनांवरून प्रवास करणे, विहित नमुन्यात वाहन क्रमांक प्लेट नसणे, फॅन्सी क्रमांक प्लेट, कर्कश हॉर्न, बेदरकार वाहन चालविणे, अठरा वर्षांखालील मुलांनी वाहन चालविणे, वाहनाचा विमा नसणे, विनाहेल्मेट वाहन चालविणे, अवजड वाहनातून प्रवासी वाहतूक करणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाईचा बडगा उगारला.

त्यातून १ लाख १२ हजार ७११ जणांवर २ कोटी ३३ लाख १२ हजार ९०० रुपयांची दंडाची नोटीस बजावली, त्यापैकी ४३ हजार ६१८ जणांनी तडजोड शुल्कापोटी ९० लाख ९१ हजार ७०० रुपये भरले, तर उर्वरित ६९ हजार ९३ जणांकडून १ कोटी ४२ लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड प्रलंबित राहिला आहे.

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे, तर रस्ते अपुरे पडू लागले आहेत. याशिवाय प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई लागली आहे. त्यामुळे अनेकदा कळत नकळत वाहतूक नियमांचा भंग करीत आहेत. दिवसाकाठी तीनशे जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.वर्षभरातील आकडेवारी अशी,तपशील                                                       केसेस        दंड

  • वाहन चालविताना परवाना नसणे -     २०,६०० ४१       २०,०००
  • प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे   १७,०९६ ३४,१९,    २००
  • ‌वाहन चालविताना मोबाइलचा वापर     ६,६३६ १३,२७     २००
  • सिग्नल जंप करणे                                १,४०३ ०२,८०    ६००
  • वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे  २,१९१ ४, ३८      २००
  • विनाहेल्मेट                                               ७४७ ०३,७३    ५००
  • मद्यपान करून वाहन चालविणे                     ३८ २४       ८००
  • इतर                                                ६३,९९७ १,३३,२९    ४००

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर