रुकडी रेल्वे अंडरग्राऊड मार्ग ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:38+5:302021-05-09T04:24:38+5:30
रूकडी माणगाव : रूकडी येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक येथे बांधलेला अंडरग्राऊंड मार्ग धोकादायक ठरत ...

रुकडी रेल्वे अंडरग्राऊड मार्ग ठरतोय धोकादायक
रूकडी माणगाव : रूकडी येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक येथे बांधलेला अंडरग्राऊंड मार्ग धोकादायक ठरत आहे. या मार्गाकडे रेल्वे प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांचे लक्ष नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने येथील लोहमार्ग विद्युत वाहक मार्ग केल्याने येथे असलेला मानवनिर्मित रेल्वे फाटक मार्ग बंद केला आहे यासाठी पर्यायी मार्ग म्हणून फाटकाशेजारी अंडरग्राऊंड सिस्टीम मार्ग सुरू केला आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे. याशिवाय दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याच्या भिंतींना योग्य ते संरक्षण न दिल्याने या भिंतींमधून गावातील सांडपाणी थेट या रस्त्याच्या मध्यभागी जमा होत आहे. तसेच या उतार मार्गावरून येत असलेल्या पाण्याच्या धाराने रस्ता शेवाळला असून, दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. योग्य संरक्षण न केल्याने या भिंतीमधून मुरूम व दगड कोसळण्याची शक्यता आहे. हा मार्ग नागरिकांना सोयीचा ठरण्याऐवजी गैरसोयीचाच जास्त ठरत आहे. याकडे रूकडी ग्रामपंचायत प्रशासन व रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या मार्गाच्या दुतर्फा मोऱ्या बांधाव्या तसेच या भिंतींना संरक्षक बांधकाम करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
०८ रेल्वे रुकडी
फोटो - रूकडी येथील रेल्वे फाटक मार्ग योग्य संरक्षक भिंतीअभावी धोकादायक बनत आहे.
छायाचित्र अभय व्हनवाडे. रूकडी रेल्वे अंडरग्राऊड मार्ग ठरतोय