रुई भरावबाबत अंतिम आराखडा तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:57+5:302021-08-15T04:25:57+5:30
इंगळी : पंचगंगा नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा ठरणारे पुलांचे व रस्त्यांचे भरावे काढून आवश्यक ठिकाणी मोरींचे बांधकाम करावे लागणार ...

रुई भरावबाबत अंतिम आराखडा तयार करणार
इंगळी : पंचगंगा नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा ठरणारे पुलांचे व रस्त्यांचे भरावे काढून आवश्यक ठिकाणी मोरींचे बांधकाम करावे लागणार असून याबाबत तालुकानिहाय आढावा बैठका घेऊन अंतिम आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
रुई-इंगळी येथील पंचगंगा नदीवरील पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या भरावाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. भरावामुळे पुराच्या पाण्याचा विसर्ग होत नसल्याने हजारो एकरांतील शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत रुई बंधाराविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींना भेटून याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुई, माणगाव, रुकडी, चंदूर, इंगळी, पट्टणकोडोली, वसगडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा लोकप्रतिनिधी समोर मांडल्या.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, कृती समितीचे निमंत्रक झाकीर भालदार, रुईचे माजी उपसरपंच सुभाष चौगुले, इंगळीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप गुदले उपस्थित होते.