महाराष्ट्र, केरळातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:17+5:302021-08-01T04:23:17+5:30

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी आज शनिवारी 31 जुलैपासून सुरू झाली ...

RT-PCR is mandatory for those coming to Karnataka from Maharashtra, Kerala | महाराष्ट्र, केरळातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक

महाराष्ट्र, केरळातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी आज शनिवारी 31 जुलैपासून सुरू झाली आहे. सीमेवरील चेकपोस्ट अर्थात तपासणी नाकाच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी तपासणीसह सर्व माहिती नोंद करूनच परराज्यातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. येथील पोलिसांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी संबंधित कागदपत्रे तपासूनच प्रत्येकाला कर्नाटकात प्रवेश देण्याची सूचना आलेले आहेत.

कोगनोळी चेक पोस्टवर आरटी -पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास खबरदारी म्हणून प्रवाशांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले होते,.ते नसेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. मात्र आता लसीच्या दोन्ही डोससोबत आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता प्रवाशांकडून झाली नाही तर त्यांची तत्काळ रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. या टेस्ट अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: RT-PCR is mandatory for those coming to Karnataka from Maharashtra, Kerala