शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांसाठी खुशखबर, घरबांधणीसाठी ६ कोटी रुपये अनुदान मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:04 IST

श्रमिक मुक्तिदलाच्या १२ वर्षांच्या संघर्षाला यश

राम मगदूमगडहिंग्लज : आजरा तालुक्यातील सर्फनाला, आंबोओहोळ व उचंगी या तीन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या ३८१ धरणग्रस्तांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून घरबांधणीसाठी प्रत्येकी १ लाख ६१ हजारप्रमाणे सुमारे ६ कोटी १३ लाख ४१ हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.पुणे येथे श्रमिक मुक्तिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ व हणमंत गुणाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे तब्बल १२ वर्षांच्या लढाईला यश मिळाले.सुरुवातीला धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी प्रत्येकी ८ हजार रुपये बिनव्याजी कर्ज दिले जात होते. त्यानंतर १० हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय झाला. परंतु, ही तुटपुंजी रक्कम आजऱ्यातील धरणग्रस्तांनी स्वीकारली नव्हती. केंद्राच्या भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार १ लाख ६१ हजारांचे अनुदान मिळावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनेही झाली.

भूखंड मिळालेल्यांनाच अनुदान!''सर्फनाला'' धरणात घर बुडालेल्या १२५ प्रकल्पग्रस्तांना शेळप व देवर्डे, ''उचंगी''च्या ११५ धरणग्रस्तांना कोळींद्रे, चित्रानगर, आवंडी व रायवाडा येथे तर ''आंबेओहोळ''च्या १४१ पैकी ४९ धरणग्रस्तांना कडगाव व लिंगनूर येथे भूखंड देण्यात आले आहेत. उर्वरित १०५ भूखंडाचे वाटप अद्याप बाकी आहे. लाभक्षेत्रातील नव्या वसाहतीत भूखंड मिळालेल्या सर्वांना ही रक्कम मिळणार आहे.

२०१३ मध्ये केंद्र सरकारने भूसंपादन व पुनर्वसन कायद्यात धरणग्रस्तांच्या घरबांधणीसाठी १ लाख ६१ हजार रुपये देण्याची तरतूद केली.परंतु, महाराष्ट्रातील पुनर्वसन कायद्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ''इंदिरा आवास''च्या धर्तीवर अनुदान मिळावे अशी मागणी होती. गेल्यावर्षी वनविभागाने ''चांदोली''च्या ७६ धरणग्रस्तांना ही रक्कम दिली. त्यानुसार ही रक्कम देण्याची कबुली महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. धरणग्रस्तांची एकजूट, सातत्यपूर्वक मागणी, पाठपुरावा आणि लढायाचेच हे यश आहे. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष, श्रमिक मुक्तिदल, महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण