शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

महाशिवरात्रीनिमित्त यड्राव येथील ओंकारेश्वर शिव मंदिरात भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:29 PM

यड्राव येथील श्री ओंकारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त संतत दुग्ध अभिषेक, शिवनाम जप,शिवलीलामृत पठण यासह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

ठळक मुद्देयड्राव येथील ओंकारेश्वर शिव मंदिरात भाविकांच्या रांगामहाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक विधी

यड्राव/कोल्हापूर  : येथील श्री ओंकारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त संतत दुग्ध अभिषेक, शिवनाम जप,शिवलीलामृत पठण यासह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.पहाटे दुग्धाभिषेक सुरुवात झाली सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या ओम नमः शिवाय जप शिवलीलामृत पठण भजन कीर्तन झाले होते. भाविकांना उन्हापासून संरक्षणासाठी दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या. आलेल्या भाविकांना उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. दिवसभर दिवसभर शिवलिंगावरसंत दुग्धाभिषेक शिवलिंगावर संतत दुग्धाभिषेकअभिषेक सुरू होते. अविनाश गाडगीळ, नितीन देवकाते व प्रशांत गोखले यांनी पौराहित्य केले.

लिंगावर अभिषेक सुरू होते मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते भाविकांना भाविकांना प्रसाद साहित्य व मुलांना मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य याठिकाणी उपलब्ध होते सायंकाळी मंदिर मंदिर प्रदक्षिणा पालखी मिरवणूक व महाआरती तसेच प्रदोष महाअभिषेक याने याने शिवरात्रिमहोत्सवाची सांगता होणार आहे. हे तीर्थक्षेत्र शिवलिंग, गणेश,पार्वती ,कासव आणि नंदी अशा पांच दैवतांच्या मूर्त्या असलेले एकमेव मंदिर आहे. पांच शिखरे असलेले हे जागृत मंदिर यड्राव ता. शिरोळ येथे आहे. जानेवारी 1983 मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचा आराखडा हेमांडपंथी पध्दतीचा आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य शिखरावरील कळसाची उंची जमिनीपासून 59 फूट आहे.मंदीराची लांबी रुंदी 60 फूट बाय 60फूट आहे . मंदिरातील सर्व मूर्त्या मार्बलच्या आहेत शिवलिंग काळ्या मार्बल मध्ये 6 फूट 3 इंच लांबीचा आहे. गणेश व पार्वती च्या मूर्त्या पांढऱ्या मार्बल मध्ये 3 फूट उंचीच्या आहेत. नंदी काळ्या मार्बलमध्ये 5 फूट लांबीचा आहे. कासव 1 फूट लांबीचा आहे. प्रत्येक मूर्तीला स्वतंत्र शिखर आहे.अशी पांच शिखरे आहेत. मंदिर प्रवेशद्वारासमोर 12 फूट उंचीची घडीव काळ्या दगडाची दीपमाळ आहे. सर्व मूर्त्या जयपूर येथील राष्ट्रपती पदक विजेते जगदिशनारायण रामकुमार पांडे यांनी घडविल्या आहेत.

मंदिराचा उत्तर दरवाजा 13 फूट बाय 12 फूट आकाराचा असून त्यावर हुबळी (कर्नाटक) येथील कारागिरांनी सुंदर कोरीव काम केले आहे. सण 1948 साली बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या सोरटी सोमनाथ येथे शिवाची ज्या विधीने पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली, त्याच विधीने येथील ओंकारेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पुण्याचे प्रख्यात याज्ञीकाचार्य पंडित ग.गो.फाटक यांच्या पौराहित्या खाली संपन्न झाला.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्री दिवशी मंदिरामध्ये शिवनाम जप, शिवसहस्र नाम, शिवलीलामृत पठण, तसेच पहाटे पासून दुग्धाभिषेक सुरू असतात.

कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी ली यड्राव -इचलकरंजी या संस्थेच्या माध्यमातून देशभक्त रत्नाप्पा कुंभार, मृगेंद्र आण्णा सुलतानपुरे व सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहकार्याने व व्यापारी बंधूंच्या मदतीने मंदिर उभारणी झाल्याने हे मंदिर म्हणजे एक श्रम देवतेचे मंदिर मानले गेले आहे.

सध्या राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंदिराचे विश्वस्त आहेत तर मंदिराचे सर्व व्यवस्थापन भरत लड्डा हे पाहतात. भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी ओंकारेश्वर युवक मंडळ कुंभोज मळा मित्र मंडळ सेव्हन स्टार ग्रुप सेव्हन स्टार ग्रुप यांनी योग्य नियोजन केले होते यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीkolhapurकोल्हापूर