शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
4
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
5
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
6
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
7
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
8
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
9
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
10
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
11
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
12
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
13
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
14
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
15
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
16
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
17
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
18
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
19
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

रोहित पवार यांचा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:45 IST

Flood Kolhapur : कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना नागरिकांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी गुरूवारी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट घेवून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेत मदत कार्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

ठळक मुद्देरोहित पवार यांचा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा हातआपत्तीचा आढावा घेतला : शहरासह कागल तालुक्यातील पूरबाधित भागाला भेट

 कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांना नागरिकांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी गुरूवारी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट घेवून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेत मदत कार्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक आणि बारामती ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना मदत केली. त्यात सोलापुरी चादर २५०० नग, बिस्कीट पुडे २१,४०० पाण्याच्या बॉटल, सॅनिटरी नॅपकिन्स प्रत्येकी २५००, क्लोरीन पावडर १२५ किलो, मॅगी नुडल्स ५००० पॅकेट, माचीस २५०० नग, मास्क २६०० नगांचा समावेश आहे. हे साहित्य कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नावीद मुश्रीफ, इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्याच्या कार्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गावे आणि कोल्हापूर शहरातील विविध नुकसानग्रस्त भागांमध्ये भेट देऊन बाधित नागरिकांना धीर दिला.विविध क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत चर्चाआमदार ऋतुराज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाला आमदार पवार यांनी भेट दिली. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कशी मदत करता येईल. नागरिकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने केले. पुनर्वसनासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत अशा विविध विषयांवर सामाजिक, व्यावसायिक, बांधकाम, आदी क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत त्यांनी चर्चा केली.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRohit Pawarरोहित पवारkolhapurकोल्हापूर