शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

Kolhapur: कुटुंबाने ओढाताण करून शिकवले, पोराने नाव काढले; मालवेच्या रोहितची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:12 IST

कोल्हापूर : आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच; पण आपल्या मुलाने शिकावे, नाव कमवावे, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे ...

कोल्हापूर : आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच; पण आपल्या मुलाने शिकावे, नाव कमवावे, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे कितीही आर्थिक संकटे आली तरी कुटुंबाने शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. आई-वडिलांच्या याच संघर्षाला यशाचे कोंदण लावत मालवे (ता. राधानगरी) येथील रोहित विद्या लक्ष्मण पाटील या मुलाने थेट ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून झेप घेतली आहे. मालवेसारख्या आडवळणाच्या गावातील एका मुलाने परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.रोहित यांचे प्राथमिक शिक्षण मालवे विद्यामंदिर, बोरवडे हायस्कूल व किसनराव मोरे हायस्कूल सरवडे येथे झाले. तर गारगोटीच्या आयसीआरई कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. इचलकरंजी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी याच विषयातून डिग्री पूर्ण केली. काही काळ शिरवळच्या एका कंपनीत नोकरी केल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेचे वेध लागले. यातून त्यांची ऑइल आणि नॅचरल गॅस या केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअरपदी निवड झाली.

हे करत असताना त्यांनी ‘इस्त्रो’ची परीक्षा दिली. यात एकदा अपयश आले. मात्र, खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवल्याने त्यांची ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच निवड झाली. त्यांना आई-वडील, चुलते कृष्णात पाटील, जयसिंग पाटील, रघुनाथ पाटील, संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

स्वप्नांना कुटुंबाचे बळआई-वडिलांनी शिक्षणासाठी एकही रुपया कमी पडू दिला नाही. ज्या-ज्या वेळी गरज लागेल त्या-त्या वेळी त्यांनी पैसे पाठवले. त्यांची यामुळे अनेकदा ओढाताण झाली असेल; मात्र ते त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. माझ्या स्वप्नांना बळ देण्याचे काम कुटुंबाने केले असल्याची भावना रोहित पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरisroइस्रो