कोल्हापुरातील खड्डेमय रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:21+5:302021-07-19T04:16:21+5:30
कोल्हापुरात गेले कित्येक दिवस रस्त्यांची डागडुजी नसल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून या ...

कोल्हापुरातील खड्डेमय रस्ते
कोल्हापुरात गेले कित्येक दिवस रस्त्यांची डागडुजी नसल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून या खड्डयांमध्ये पाणी साचून राहिल्याने ते मोठे होत आहेत. अनेकदा खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीस्वारास अपघाताला सामोरे जावे लागत आहे. हे खड्डे बुजवले तर असे अपघात टाळता येतील. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
फोटो क्रमांक : १८०७२०२१-कोल- शाहुपुरी -
ओळी : कोल्हापुरातील उषा टाॅकीजसमोरील शाहुपुरी पहिल्या गल्लीत उन्हाळा असो वा पावसाळा अशी खड्डेमय स्थिती कायम असते. त्यामुळे या परिसरातून जा-ये करताना नागरिकांना जीव नकोसा झाला आहे.
फोटो : १८०७२०२१-कोल-शिवाजी पेठ०१
आेळी : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक ते उभा मारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असे मोठ मोठ खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावर महापालिकेचे विभागीय कार्यालय असून देखील गेले कित्येक वर्षे या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.
फोटो : १८०७२०२१-कोल- शिवाजी रोड
आेळी : शहरातील प्रमुख रस्ता समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी रोडवरील आझाद काॅर्नर येथे रस्त्याच्या कडेला मोठी गटार उघडून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्यावेळी व रात्री येथे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
फोटो : १८०७२०२१-कोल- गुजरी काॅर्नर
आेळी : गुजरी ते रंकाळावेश बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे.
१८०७२०२१-कोल-एसटी स्टँड
आेळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातही असा मोठा खड्डा निर्माण झाला आहे.
वारंवार बसेस जाऊन हा खड्डा आणखी मोठा होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
(सर्व छाया : नसीर अत्तार )