शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आठवड्यापूर्वी कट रचून टाकला ट्रॅव्हल्समध्ये दरोडा; कर्जमुक्ती, चैनीसाठी विशीतील तरुणांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:18 IST

अवैध पार्सल वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : ट्रॅव्हल्समध्ये क्लीनर म्हणून काम करणारा सैफू बशिर अफगाणी (वय २३, रा.विक्रमनगर, कोल्हापूर) याने कर्जातून मुक्त होण्यासाठी ट्रॅव्हल्समधील किमती वस्तूंच्या वाहतुकीची टीप भावाकरवी अक्षय कदम या मित्राला दिली. आठवड्यापूर्वीच त्यांनी एकत्र येऊन ट्रॅव्हल्समध्ये दरोडा घालण्याचा कट रचला. ठरल्यानुसार, त्यांनी दरोडा घालून ६० किलो चांदीसह १० ग्रॅम सोने लंपास केले. विशीतील तरुणांनी केलेला हा गंभीर प्रकार अवघ्या १२ तासांत पोलिसांनी उघडकीस आणला. मात्र, त्या निमित्ताने आचारसंहिता काळातही होत असलेल्या अवैध पार्सल वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विक्रमनगर येथे राहणारा सैफू अफगाणी हा गेल्या तीन महिन्यांपासून एका ट्रॅव्हल्समध्ये क्लीनर म्हणून काम करीत आहे. त्याच्यावर साडेआठ लाखांचे कर्ज आहे. कर्जफेडीसाठी चोरीचा विचार त्याच्या मनात आला. या ट्रॅव्हल्समधून सोने, चांदी अशा किमती पार्सलची वाहतूक होत असल्याची माहिती त्याला मिळाली. याच मुद्देमालावर डल्ला मारण्याचा डाव त्याने आखला. त्याने याची माहिती भाऊ जैद अफगाणी (२१) याला दिली.

वाचा : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

जैद याने विक्रमनगरातील मित्र अक्षय कदम (३१) याला पार्सल वाहतुकीची माहिती दिली. आठवड्यापूर्वी कदम याने त्याचा सांगलीतील भाचा सुजल चौगले (२०) याला बोलवून घेतले. चौघांनी कदमवाडीत एकत्र येऊन ट्रॅव्हल्समध्ये दरोडा घालण्याचा कट रचला आणि ठरल्यानुसार सोमवारी (दि. २२) रात्री अकराच्या सुमारास दरोडा घालून सव्वाकोटीचा मुद्देमाल लंपास केला.या गुन्ह्यातील अक्षय कदम वगळता इतर सर्व आरोपी १८ ते २५ वयोगटांतील आहेत. यांच्यावर आधीचे काही गुन्हे दाखल नाहीत. ते मोलमजुरी आणि खासगी कंपनीत काम करतात. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि चैनीसाठी दरोडा घातल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमालासह तीन दुचाकी, सात मोबाइल आणि दोन कोयते जप्त केले आहेत. त्यांच्यावर पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

मुद्देमालाची आयकरकडून चौकशी होणारदरोडेखोरांकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाचा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. जप्त चांदी कोणत्या सराफांकडून आली होती? त्याची बिले आहेत काय? पार्सलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चांदीचे प्रत्यक्ष वजन आणि बिलातील वजन योग्य आहे काय? याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.आचारसंहितेतही राजरोस वाहतूकआचारसंहिता सुरू असताना मोठी रोकड आणि किमती वस्तूंच्या वाहतुकीची पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी लागते. सोबत पार्सल वाहतुकीचे पत्र ठेवावे लागते. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीने सोने-चांदीच्या वाहतुकीची माहिती दिली नव्हती, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Youths planned robbery for debt relief, luxury; valuables stolen.

Web Summary : Kolhapur youths, including a travels cleaner, planned and executed a robbery, stealing gold and silver to pay off debts and fund luxuries. Police recovered the stolen goods, motorcycles, and weapons, highlighting illegal parcel transport during election code.