Roads at Ford Corner open, channel work completed by contractor | फोर्ड कॉर्नर येथील रस्ता खुला, ठेकेदाराकडून मुदतीमध्ये चॅनेलचे काम पूर्ण
कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूम मार्गावरील आर. सी. सी. चॅनल टाकण्याचे काम शनिवारी सकाळी पूर्ण झाले. यानंतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला.

ठळक मुद्देफोर्ड कॉर्नर येथील रस्ता खुलाठेकेदाराकडून मुदतीमध्ये चॅनेलचे काम पूर्ण

कोल्हापूर : फोर्ड कॉर्नर येथील जुना पेट्रोल पंप येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच परिसरातील व्यावसायिकांना फटका बसत होता. सव्वा महिन्यानंतर हा रस्ता पूर्ववद सुरु झाला आहे.

फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूम परिसर हा सखल भागात असल्यामुळे जरा जरी पाऊस झाल्यास येथे चार ते पाच दिवस पाणी साठून राहत होते. अनेकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्येही पाणी शिरत होते. उमा टॉकीज, अयोध्या टॉकीज परिसरातील सांडपाणी येथील ड्रेनेज लाईनमधून जाते.

सखल भाग आणि जुन्या लाईनमुळे वारंवार गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत होते. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम ५ नोव्हेंबरपासून सुरू केले. दीड महिन्यांत काम पूर्ण होणार होते. ठेकेदाराने मुदतीच्या आतच काम पूर्ण केले.

 

 

Web Title: Roads at Ford Corner open, channel work completed by contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.