शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:09 IST

जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.

म्हाकवे : मुरगूड-निपाणी या आंतरराज्य मार्गावर लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील पोलीस चौकीमध्ये ट्रक घुसल्याने पोलीस चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने ही पोलीस चौकी बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या सुरू असणाऱ्या या रस्त्याच्या - नियोजनशून्यतेमुळेच चालकाला अंदाजच न आल्याने त्याचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.मुरगुडहून निपाणीकडे (एमएच४३-वाय-८०२०) हा ट्रक जात होता. या पोलीस चौकीच्या समोरच काँक्रीटचा रस्ता संपला आहे. त्यानंतर दगड मुरुमाचा भराव आहे, त्यामुळे येथे रस्ता चढ-सकल बनला आहे. सुदैवाने पूर्वेकडे जाणारा ट्रक दक्षिणेकडील चौकीकडे घुसला. जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी रास्तारोको मंत्र्यांना अडविणे यासह विविध आंदोलने करत आवाज उठवत आहेत. परंतु येथील पोलीस या आंदोलकांनाच थोपवत वेळ मारून नेत होते. या घटनेने तरी प्रशासनाचे डोळे उघडणार काय, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलAccidentअपघातPoliceपोलिस