महापौरांच्या प्रभागात रस्त्यांची चाळण

By Admin | Updated: January 14, 2015 23:19 IST2015-01-14T23:02:47+5:302015-01-14T23:19:35+5:30

अनेक विकासकामे : रखडलेले रस्ते, धुळीचे साम्राज्य

Road block in the mayor's office | महापौरांच्या प्रभागात रस्त्यांची चाळण

महापौरांच्या प्रभागात रस्त्यांची चाळण

कोल्हापूर : ‘शहराच्या प्रथम नागरिक’ महापौर तृप्ती माळवी यांच्या प्रतिभानगर प्रभागात त्यांनी गेली तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वास गेले पण, त्यामुळे येथील रस्त्यांचे काम रखडले आहे. परिणामी परिसरात धुळीचे साम्राज्य आहे.प्रतिभानगर प्रभागात शाहूनगर, जगदाळे कॉलनी, प्र्रतिभानगर, महावीरनगर हा परिसर येतो. मोठाले रस्ते आणि विस्तीर्ण रचना असलेला हा प्रभाग. अवधूत माळवी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या तृप्ती माळवी यांना प्रभागातील नागरिकांनी बहुमताने निवडून दिले. नगरसेवक म्हणून महापालिकेच्या कामकाजाची माहिती करून घेण्यापासून ते महापौरपदापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे वाखाणण्याजोगा. या प्रभागात गेली अनेक वर्षे ड्रेनेज, पिण्याचे पाणी व रस्त्यांचा प्रश्न भेडसावत होता. पिण्याच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती असल्याने पाणी कमी दाबाने येत होते. माळवी यांनी ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावला. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनही टाकण्यात आली पण या खुदाईमुळे रस्त्यांचे काम रखडले. रस्ते मंजूर असले तरी ते काम अजून सुरू झाले नसल्याने नागरिकांना कसरत करावी लागते. महापालिकेच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. बीओटी तत्त्वावर स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव टेंडर न भरल्याने रखडला आहे.

उद्याचा प्रभाग क्रमांक - ६३ शाहू बॅँक
गेल्या पाच वर्षांत नगरसेविका म्हणून प्रभागात ड्रेनेज, पाण्याची सोय आणि रस्त्यांचे अधिकाधिक प्रश्न मार्गी लावले आहेत. काही रस्त्यांचे काम पाईपलाईनमुळे थांबले आहे. येत्या दोन महिन्यांत तेदेखील पूर्ण होतील. महापौर म्हणून शहरातील विकासकामांना प्राधान्य दिले. माझ्या कारकिर्दीत थेट पाईपलाईन आणि नगरोत्थानची कामे मार्गी लागली, याचा विशेष आनंद आहे. - तृप्ती माळवी (महापौर)



विद्यमान नगरसेविका : तृप्ती माळवी
महापौर काळातली महत्त्वाची कामे
१गेली ४० वर्षे रखडलेल्या थेट पाईपलाईनचे उद्घाटन महापौर कार्यकाळात. नगरोत्थानमधील रस्त्यांची कामे मार्गी.
२‘प्रथम नागरिक’ म्हणून शहराचा डोलारा सांभाळताना ‘जनता दरबार’ सुरू केला. त्यात सर्वसामान्यांचे महापालिकेमुळे अडलेली कामे मार्गी लावली.
३‘आयआरबी’ने नकार दिलेल्या रंकाळा येथील रस्त्यासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी.


विकासकामांचा दावा
(प्रभागातील विकासकामांवर खर्च झालेला निधी : २ कोटी )
शासन अनुदानातून ड्रेनेजचे काम , वि. स. खांडेकर शाळेचे रंगकाम,
कंपौंड व अंतर्गत सोयी-सुविधा : १९ लाख
जगदाळे कॉलनी, शाहू दत्त मंडळ परिसरातील रस्ते ५ लाख २५ हजार
नियोजन समितीअंतर्गत दत्त गल्लीत रस्ता : ६ लाख
नगरोत्थानअंतर्गत नार्वेकर मार्केट, सुभाषनगर, एनसीसी भवन ते वि. स. खांडेकर शाळा रस्ते : ४ कोटी ५१ लाख
प्रभागांतर्गत रस्ते, गटर्स, पदपथ : ४७ लाख ५० हजार
महापौर बजेटअंतर्गत १५ लाखांचे रस्ते मंजूर
शास्त्रीनगर-बुद्ध गार्डन रस्त्यासाठी ३७ लाखांचा निधी मंजूर
बाईचा पुतळा ते प्रतिभानगर रस्त्यासाठी ४० लाख मंजूर

Web Title: Road block in the mayor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.