कोल्हापूर : दंगल नियंत्रणासाठी आणि गर्दीवर नजर ठेवण्यासाठी गृह विभागाकडून जिल्हा पोलिस दलास सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळाली. गृह विभागातील दळणवळण विभागाचे अपर पोलिस महासंचालक दीपक पांड्ये आणि विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) पोलिस अधीक्षक कार्यालयात व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास पांड्ये यांनी व्यक्त केला.पोलिस दलाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याअंतर्गत राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना ३६० सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दिल्या आहेत. यातील एक व्हॅन कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास मिळाली. अपर पोलिस महासंचालक पांड्ये आणि विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.या व्हॅनमध्ये चार बाजूला चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात ४८ तासांचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे. याचे थेट प्रक्षेपण पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पोलिस अधीक्षकांच्या मोबाइलवर पाहता येते. चित्रीकरणासह दंगल काबू करणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे.यावेळी पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी रक्षिता यादव, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक सूरजसिंह रजपूत, गजेंद्र लोहार उपस्थित होते.आणखी ४७० सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळणार राज्यासाठी आणखी ४७० सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळणार आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचे अपर पोलिस महासंचालक पांड्ये यांनी सांगितले. २१ लाख ५० हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या विशेष व्हॅनमध्ये १० ते १२ पोलिस बसू शकतात. व्हॅनच्या छतावरही पोलिसांना बसण्याची व्यवस्था केली आहे. आपत्कालीन स्थितीत लागणाऱ्या वैद्यकीय सुविधाही व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत.
Web Summary : Kolhapur police received a CCTV surveillance van from the Home Department to monitor crowds and control riots. The van has four cameras, 48-hour recording capacity, and live feed to HQ. More vans are planned for each police station.
Web Summary : कोल्हापुर पुलिस को गृह विभाग से भीड़ पर नज़र रखने और दंगों को नियंत्रित करने के लिए एक सीसीटीवी निगरानी वैन मिली। वैन में चार कैमरे, 48 घंटे की रिकॉर्डिंग क्षमता और मुख्यालय को लाइव फीड है। प्रत्येक पुलिस स्टेशन के लिए और वैन की योजना बनाई गई है।