शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

लक्षतीर्थ वसाहत हल्लाप्रकरणी रिंकू देसाईसह दोघांना अटक, मोबाईल लोकेशनवरून लावला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:31 IST

मोबाईल लोकेशनवरून कर्नाटकातील चिक्कोडीतून गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले

कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहतमध्ये दोघांवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप असणारा संशयित रिंकू ऊर्फ विजयसिंह वसंतराव देसाई (वय ४०, रा. बोंद्रेनगर), नीतेश तानाजी वरेकर (२६, रा. शिंगणापूर) या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. मोबाईल लोकेशनवरून कर्नाटकातील चिक्कोडीतून गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले.वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या कारणावरून फुलेवाडीत १५ मे रोजी दोन गटांत वाद झाला होता. त्यानंतर लक्षतीर्थ वसाहत येथे तलवार, चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुख्य संशयित रिंकू देसाईसह १६ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील १४ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी दिली होती.दरम्यान, रिंकूसह दोघेजण पोलिसांच्या हाती लागत नव्हते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक इकबाल महात यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे मोबाईल लोकेशन शोधले. ते कर्नाटकातील चिकोडीत असल्याचे कळाले. त्यानुसार तेथे सापळा रचून त्यांना अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी