रिक्षा उलटून चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:24+5:302021-02-05T07:10:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येलूर (ता. शाहूवाडी) येथे कुत्रे आडवे आल्याने भरधाव रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचालक चंद्रकांत ...

रिक्षा उलटून चालक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येलूर (ता. शाहूवाडी) येथे कुत्रे आडवे आल्याने भरधाव रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचालक चंद्रकांत पांडुरंग पोवार (वय ४२, रा. येलूर) हे जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. त्यांच्यावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. निशा सुभाष कांबळे (वय ३१, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी मंगळवारी सकाळी दाखल केले होते.
अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर : ठिकपूर्ली (ता. राधानगरी) येथे अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा मंगळवारी सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विठ्ठल गुंडाप्पा येटाळे (वय ६०, रा. जोगेवाडी, ता. राधानगरी) असे त्या मृताचे नाव आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी हा अपघात घडला होता. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.