शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:54 IST

दोघा संशयितांना अटक

गांधीनगर, उचगाव : दारु पिऊन शिवीगाळ केल्याने उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यात प्रशांत बाबूराव पंडित (वय ३८, रा. यादववाडी, उचगाव, ता. करवीर ) या रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून केला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी यश दीपक दोरकर (वय २१, रा. यादववाडी, उचगाव) आणि अमित खुदबुद्दीन आयनापुरे (वय २२, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतची माहिती अशी की, प्रशांत हा रिक्षाचालक असून, येथील मणेर मळा रिक्षा स्टॉपचा तो माजी अध्यक्ष आहे. आई, वडील, पत्नी आणि एका मुलासह तो यादववाडी येथे राहतो. काल सायंकाळी प्रशांत हे घरातून एका कामासाठी बाहेर गेले, परंतु घरी परतले नाहीत. सोमवारी सकाळी येथील हनुमान मित्रमंडळाच्या खोलीच्या मागे प्रशांतचा मृतदेह डोक्यात दगड घालून खून झाल्याच्या स्थितीत आढळून आला.

खून झाल्याची घटना परिसरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, गांधीनगरचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने श्वानपथक पाचारण केले. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळे आणि पोलिस अंमलदारांचे पथक तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस अंमलदार वैभव पाटील आणि विशाल खराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, हा खून यश दोरकर आणि अमित आयनापुरे यांनी केल्याचे समजले.

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना गुन्ह्याबाबत विचारले असता प्रशांतने शिवीगाळ केल्याने त्याला दगडाने ठेचून मारल्याचे त्यांनी सांगितले. या संशयित आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Drunk Man Killed After Argument; Two Arrested

Web Summary : A रिक्षाचालक (rickshaw driver) was stoned to death in Kolhapur after an argument fueled by alcohol. Police arrested two suspects, Yash Dorkar and Amit Aynapure. The incident occurred in Maner Mala, Uchgaon. Investigation ongoing.