डोक्यात फरशी घालून रिक्षाचालकाचा खून; क्षेत्र माहुलीतील घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:00 IST2020-01-31T10:59:37+5:302020-01-31T11:00:57+5:30

सातारा : डोक्यात फरशी घालून क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील अभिजित अशोक मोहिरे (वय ३२) या रिक्षाचालकाचा निर्घृण खून ...

Rickshaw driver murdered in the head with a pavement | डोक्यात फरशी घालून रिक्षाचालकाचा खून; क्षेत्र माहुलीतील घटनेने खळबळ

डोक्यात फरशी घालून रिक्षाचालकाचा खून; क्षेत्र माहुलीतील घटनेने खळबळ

ठळक मुद्देकारण अस्पष्ट :

सातारा : डोक्यात फरशी घालून क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील अभिजित अशोक मोहिरे (वय ३२) या रिक्षाचालकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, अभिजित हा साताऱ्यात रिक्षा चालवत होता. रात्री नऊ वाजता अभिजित रिक्षा घेऊन घरी गेला. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. तसेच डोक्यात फरशी घालून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले.

या प्रकाराची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अभिजितचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे समोर आले नाही. रिक्षा व्यावसायातून त्याचा कोणाशी वाद झाला होता का, याचीही पोलीस माहिती घेत आहेत. हल्लेखोरांचे धागेदोरे रात्री उशिपर्यंत पोलिसांना मिळाले नव्हते.

Web Title: Rickshaw driver murdered in the head with a pavement