(सुधारित) ‘राष्ट्रवादी’तर्फे पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST2020-12-14T04:36:19+5:302020-12-14T04:36:19+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान देण्याचा शपथ कार्यक्रम नुकताच ...

(Revised) The NCP has taken an oath to create the Maharashtra of Pawar's dreams | (सुधारित) ‘राष्ट्रवादी’तर्फे पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची घेतली शपथ

(सुधारित) ‘राष्ट्रवादी’तर्फे पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची घेतली शपथ

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान देण्याचा शपथ कार्यक्रम नुकताच येथील सायबर चौकात झाला. पक्षाचे कोल्हापूर दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी लाडू वाटप झाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायबर चौकामध्ये पक्षाच्यावतीने फलक उभारला. शेतकरी, महिलांसह कला, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, आदी क्षेत्राला पवार यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याचा यावेळी आढावा घेतला. त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करत त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात अध्यक्ष नितीन पाटील, पीटर चौधरी, निरंजन कदम, सुरेंद्र माने, विनायक जगनाडे, अंकुश रांजगणे, सुनीता कांबळे, शुभांगिणी चिनाटे, संपदा काळे, गब्बर मुल्ला, राजेंद्र मोरे, दीपक कश्यप, कल्पना रांजगणेकर, राजू मुल्ला, बापू पोवार, संग्राम जाधव, रिजाय जैनापुरे आदींचा मोठा सहभाग होता.

फोटो नं. १३१२२०२०-कोल-एमसीपी०१

ओळ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिनी राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर दक्षिणच्यावतीने सायबर चौकात शुभेच्छा फलक उभारून पवार यांच्या सप्नातील महाराष्ट्र घडविणार असल्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

Web Title: (Revised) The NCP has taken an oath to create the Maharashtra of Pawar's dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.