शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याचदिवशी २०० कोटींचा महसूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : पदोन्नत्या, कोविड लाभ, रेराअंतर्गत कारवाई, अनुकंपा भरती या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नोंदणी व मुद्रांक विक्रेत्यांनी ...

कोल्हापूर : पदोन्नत्या, कोविड लाभ, रेराअंतर्गत कारवाई, अनुकंपा भरती या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नोंदणी व मुद्रांक विक्रेत्यांनी सुरू केेलेल्या कामबंद आंदोलनाच्या पहिल्याचदिवशी २०० कोटींचा महसूल बुडाला आहे. मुद्रांकशी संबंधित राज्यातील १६०० कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनदेखील शासनाकडून मुद्रांकमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. मागील पंधरवड्यात कामबंद आंदोलनाचा इशारा देऊनदेखील शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात झाली.

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांना ५० लाखांची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या कोराेना काळात मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना ५० लाखांची भरपाई व अनुकंपा तत्त्वावर भरती करून घ्यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. रेराअंतर्गत विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे, त्या कारवाया मागे घ्याव्यात, अशी एक मागणी आहे. पदोन्नतीच्याबाबतीत सातत्याने टोलवाटोलवी केली जात आहे. नवीन सेवा प्रवेश नियम न लावता पदोन्नतीची मागणी आहे. रिक्त पदेही बऱ्याच वर्षांपासून भरलेली नाहीत.

चौकट

नागरिकांचा खोळंबा

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर आता बऱ्यापैकी सरकारी कामे सुरू झाली असून, व्यवहारही वाढले आहेत. मुद्रांक नोंदणी व विक्रीसाठी रांगा लागलेल्या आहेत. कोरोना तपासणी नियमही शिथिल केल्याने गर्दीत वाढ झाली आहे. आता कामे युध्दपातळीवर करून घेतली जात असतानाच हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झाल्याने नागरिकांची नोंदणीची सर्व कामे ठप्प झाली आहेत.

प्रतिक्रिया

अजून चर्चेचे निमंत्रण आलेले नाही. बैठकीला बोलावले तर जाऊ, पण सध्या कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. शासनाला आम्ही सातत्याने मुदत दिली, पण त्यांनी लक्ष दिले नाही. आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

गजानन खोत, राज्याध्यक्ष, राजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघटना, मुद्रांक व नोंदणी

फोटो: २१०९२०२१-कोल-स्टाम्प ०१, ०२

फोटो ओळ : मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदाेलन सुरू केलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कायम गजबजलेले नोंदणी केंद्र असे ओस पडले होते. दारासमोर लावलेले कामबंद आंदोलनाची नोटीस बघून नागरिक माघारी फिरत होते.

(छाया: नसीर अत्तार)