शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

Kolhapur: मुद्रांक अधिकारी वाघमोडे यांची चौकशी होणार, महसूल मंत्र्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:39 IST

भुदरगडचे अधिकारी कुंभार निलंबित, लोकमतने प्रकरण आणले उजेडात..

कोल्हापूर : येथील मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा दिले. गारगोटीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि राज्य शासनाच्या मालकीच्या विश्रामगृहाच्या जागा विक्रीप्रकरणी भुदरगडचे दुय्यम निबंधक अधिकारी वसंत कुंभार यांना महसूलमंत्र्यांनी तडकाफडकी निलंबित केले. हा माणूस आजल सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर कार्यालयात राहता कामा नये, असे महसूलमंत्र्यांनी बजावले. अधिकृत सूत्रांनी त्यास दुजोरा दिला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पत्रानुसारच दृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.मंगळवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुणे विभागातील अधिकाऱ्यांची व्हीसीव्दारे बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी वाघमोडे यांच्याबद्दलच्या तक्रारींचा विषय काढला. त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी कुंभार यांना तातडीने निलंबित करण्याच्या तर वाघमोडे यांची खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला.

जिल्ह्यातील गावठाण वाढीसाठी सर्व्हे, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासंबंधी पालकमंत्री आबिटकर यांनी बैठकीची मागणी केली होती. त्यास पालकमंत्री आबिटकर, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महसूलचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. यामध्ये पालकमंत्री आबिटकर यांनी वाघमोडे यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन महसूलमंत्री बावनकुळे यांनी त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.ही चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री आबिटकर यांनी गारगोटी येथील सरकारी विश्रामधामच्या विक्रीचा विषय उपस्थित केला. गटक्रमांक ५२६ अ मधील २६ गुंठ्याची खरेदी १९ डिसेंबर २०२४ ला रेडिरेकनरप्रमाणे ४० लाख रुपये किमतीला झाली आहे. या जमिनीच्या सातबारा पत्रकी १९८५ पासून पीकपाणी सदरात ५ गुंठे विश्रामधाम इमारतीची नोंद आहे. या जागेच्या उताऱ्यावर भोगवटादार वर्ग एक आहे. त्यावर इतर कोणताही शेरा नाही. महसूल यंत्रणेने त्यावर सरकारी जमीन म्हणून नोंद करणे अपेक्षित होते ती त्यांनी न केल्याने या जमिनीचा व्यवहार झाला आहे.दुय्यम निबंधक वसंत कुंभार यांनी या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार करताना अधिक चौकशी करण्याची गरज होती असे मंत्री आबिटकर यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शासनाच्या विश्रामगृहाची विक्री झाल्याचे ऐकल्यावर महसूल मंत्र्यांनी त्याची गंंभीर दखल घेऊन कुंभार यांना आजच्या आज निलंबित करण्याचे आदेश दिले. विश्रामगृहाचा व्यवहार होत असताना जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून तुम्ही काय करत होता, अशी विचारणा बैठकीत वाघमोडे यांना करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचनाविश्रामगृहाच्या जागेच्या नीट नोंदी न केल्यामुळे गारगोटीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

दुसऱ्यांदा निलंबनकुंभार मूळचे सांगलीचे आहेत. यापूर्वी तिथे असतानाही ते निलंबित झाले होते. त्यानंतर त्यांची बदली २०२२ ला भुदरगडला झाली. येथेही त्यांच्यावर तशीच कारवाई झाली.

लोकमतने प्रकरण आणले उजेडात..लोकमतने २३ जानेवारी २०२५ ला विश्रामगृह विक्रीचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यावरील कारवाई होण्यासाठी तब्बल तीन महिने जावे लागले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे