Return sent to those who do not have a covid negative certificate | कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना पाठविले परत

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना पाठविले परत

ठळक मुद्देकोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना पाठविले परतकोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवरून कर्नाटकात प्रवेश बंद

कोगनोळी : महाराष्ट्र व केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी इथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.

आपल्या शेजारील राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळी येथून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत पाठीमागे महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.  याठिकाणी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक आय एस गुरुनाथ, पीएसआय बी एस तळवार यांच्या सह पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Return sent to those who do not have a covid negative certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.