शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निवृत्त नायब तहसीलदारास लाच घेताना अटक, रेंदाळमधील जमिनीचा मोबदला देण्यासाठी घेतले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:30 IST

चांगली माहिती आहे म्हणून रीतसर पेन्शन असूनही ३० हजार मासिक मानधनावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

कोल्हापूर : दूधगंगा कालव्यासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे वरिष्ठांकडून काम करून घेण्यासाठी रेंदाळ (ता.हातकणंगले) येथील शेतकऱ्याकडून ८ हजारांची लाच घेताना भूसंपादन कार्यालयातील (क्रमांक ६) मानधनावरील कर्मचारी असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच उद्योग भवनासमोर ही कारवाई करण्यात आली. ईलाही मीरा मुल्ला (वय ७१, रा. २५१९, ‘डी’ वॉर्ड, डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.घडले ते असे : तक्रारदार शेतकऱ्याची गट नंबर ९८७ मध्ये सामायिक शेती आहे. त्यातील ६० गुंठे क्षेत्र कालव्यासाठी भूसंपादित केले आहे. त्याचा मोबदला मिळवण्यासाठी तक्रारदारांच्या वडील, काका व आत्या यांच्या नावे नोटीस निघाली होती; परंतु तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तो मोबदला मिळण्यासाठी त्यांनी ४ सप्टेंबर २०२५ ला भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे त्यांनी अर्ज केला होता.त्या अर्जाचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार ३ नोव्हेंबर २०२५ ला नष्टे यांच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा मुल्ला त्यांना भेटला व हे काम करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागितली. म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी उद्योगभवनजवळ सापळा लावण्यात आला आणि मुल्ला लाच घेताना सापडला.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, संदीप काशीद, संगीता गावडे, सचिन पाटील, उदयसिंह पाटील, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.

फायलीवर सही होताच..संबंधित तक्रारदार यांच्या मोबदल्याचे प्रकरण २०१६ पासून सुरू आहे. त्यासाठी ते वारंवार हेलपाटे मारत होते; परंतु गेल्या आठवड्यात ते येऊन पैसे देतो, असे सांगून गेले. नेमके योगायोगाने त्यांचा मोबदला मंजूर करण्याच्या फायलीवर उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दुपारी १ वाजता सही केली. ती फाइल घेऊनच मुल्ला खाली आले. टेबलवर फाइल ठेवून ५ मिनिटांत येतो, असे सांगून बाहेर पडले आणि तिथेच त्यांना अटक झाली.

चांगली माहिती म्हणून..मुल्ला हे गेली अनेक वर्षे त्याच कार्यालयात सेवेत आहेत. नियमित सेवेतून २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांना या विभागातील चांगली माहिती आहे म्हणून रीतसर पेन्शन असूनही ३० हजार मासिक मानधनावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

तीन फायली नेल्याअटकेची कारवाई होताच उपअधीक्षक वैष्णवी पाटील या तातडीने मुल्ला काम करत असलेल्या कार्यालयात आल्या व त्याच्या टेबलवरील या प्रकरणाशी संबंधित तीन फायली घेऊन गेल्या. लाच कारवाई झाल्याची माहिती त्यांनी नष्टे यांना दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Official Arrested for Bribe in Kolhapur Land Compensation Case

Web Summary : A retired officer was caught red-handed accepting a bribe for land compensation. He demanded money from a farmer to expedite payment for land acquired for a canal project. Police arrested him near the Collector's office after a complaint.