शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:40 AM

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ...

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले.ते म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवस कसा जायचा हेच समजत नव्हते. मागील १५ दिवसांत रोज तीन ते चार तासच झोप मिळायची. रोज पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरू होतो. मंगळवारी मतदान झाल्यानंतर निवांत झालो. बुधवारी सकाळी साडेसात वाजता उठलो. घरी भेटण्यासाठी कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी चर्चा करून मतदारसंघातील विवाह, तसेच अन्य समारंभांसाठी उपस्थिती लावली.दिवसभर पट्टणकोडोली, इस्लामपूर, आदी गावांतील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील विविध मतदारसंघांतील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील काही दिवस दौरा करणार आहे. विश्रांतीसाठी मी कधीच सुटी घेऊन बाहेर जात नाही. शेतकरी व कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधण्यातून मला विश्रांती मिळते. ऊसदर आंदोलनावेळी अनेकदा ताणतणाव यायचा. त्याच्या तुलनेत निवडणूक कालावधीतील तणाव कमी होता. संयमाने वाटचाल आणि विरोधकांना सामोरे गेल्याने या तणावाचा परिणाम माझ्यावर झाला नाही.शेतकऱ्यांचे चेहरे, कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ऊर्जामी संवेदनशील आहे. या निवडणुकीत प्रचारामध्ये विरोधकांकडून जिव्हारी लागणारी टीकाटिप्पणी झाली. त्यावेळी थोडे नैराश्य आणि विरक्तीची भावना मनात यायची. मात्र, त्याचवेळी विविध प्रश्न असलेल्या शेतकºयांचे चेहरे डोळ्यांसमोर यायचे. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे या विचारामुळे मग नैराश्य, विरक्तीची भावना आपोआप दूर गेली. शेतकºयांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ऊर्जा मिळत असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.