चिल्लर पार्टीच्या ढोल वाजतोयच्या प्रयोगाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:20 PM2020-11-24T19:20:04+5:302020-11-24T19:21:52+5:30

govindpansare, natak, kolhapurnews ढोल वाजतोय च्या प्रयोगाने सामाजिक भान सांगणाऱ्या एकांकिकेला चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी मंगळवारी भरभरुन दाद दिली. फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूलच्या कलाकारांनी सादर केलेल्या या एकांकिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी या कलाकारांनी डॉ. धर्मवीर भारती यांच्या कविता सादर केल्या.

Response to the chiller party drumming experiment | चिल्लर पार्टीच्या ढोल वाजतोयच्या प्रयोगाला प्रतिसाद

कॉ. गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त चिल्लर पार्टी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूलच्या कलाकारांनी मंगळवारी ढोल वाजतोय ही एकांकिका सादर केली.

Next
ठळक मुद्देचिल्लर पार्टीच्या ढोल वाजतोयच्या प्रयोगाला प्रतिसादकॉ. गोविंद पानसरे जयंती साजरी : फिनिक्सच्या कलाकारांना दाद

कोल्हापूर : ढोल वाजतोय च्या प्रयोगाने सामाजिक भान सांगणाऱ्या एकांकिकेला चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी मंगळवारी भरभरुन दाद दिली. फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूलच्या कलाकारांनी सादर केलेल्या या एकांकिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी या कलाकारांनी डॉ. धर्मवीर भारती यांच्या कविता सादर केल्या.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत केवळ हितचिंतकांसाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित ह्यढोल वाजतोयह्ण ही एकांकिका आणि डॉ. धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या हिंदी नाटकाच्या प्रस्तावनेचे सादरीकरण तसेच राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या हिंदी काव्य संग्रहातील सर्ग सादर करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत स्टर्लिंग टॉवरजवळ प्राथमिक शिक्षक बँकेसमोरील फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूल येथे हा विचार करण्यास प्रवृत्त करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.

ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून या कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक संजय मोहिते, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, जेष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री खटावकर यांच्यासह फिनिक्सचे कलाकार उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. धर्मवीर भारती यांच्या ह्यअंधा युगह्ण या हिंदी नाटकातील प्रस्तावना तसेच राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या काव्य संग्रहातील कृष्ण की दुर्योधन को चेतावणी हा सर्ग या कलाकारांनी सादर केले.

यावेळी चिल्लर पार्टीने प्रकाशित केलेल्या सिनेमा पोरांचा हे पुस्तक देउन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. चिल्लर पार्टीचे मिलिंद कोपर्डेकर यांनी प्रास्ताविक केले तर रविंद शिंदे यांनी आभार मानले.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे लहान मुलांना, विशेषत: गरीब आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी जगातील उत्तमोत्तम सिनेमे विनामूल्य दाखविण्यात येतात. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.

ढोल वाजतोय या एकांकिकेचे दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी केले आहे. निर्माते, दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या फिनिक्स अ‍ॅक्टिंग स्कूलची निर्मिती असलेला विजय टाकळे लिखित या एकांकिकेचे लेखन विजय टाकळे यांनी केले आहे.

यामध्ये विजयंत शिंदे, मोहन गोजारे, जीवन पाटील, सौरभ कोरे, सुभाष बेबले, निखिल सिंग्री यांनी अभिनय केला आहे. याशिवाय असंग दीपंकर (संगीत), सचिन वाडकर (प्रकाश योजना), राकेश गाठ (सूत्रधार), विनायक कुंभार, अंकुश तिवारी, चिंतन पाटील (सहाय्यक) या फिनिक्सच्या कलाकारांचा यात सहभाग आहे.

 

Web Title: Response to the chiller party drumming experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.