शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:00 IST

Lokmat Event BloodDonation Kolhapur : लोकमतच्या महारक्तदान अभियानाला शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मिळून २० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने सहकार्य केले.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद २० पिशव्या संकलन : दत्तक ६ गावातही होणार शिबीर

गडहिंग्लज : लोकमतच्या महारक्तदान अभियानाला शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मिळून २० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने सहकार्य केले.लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले.प्रारंभी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व लोकमतच्या वितरण विभागाचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजनाने शिबीराचे उद्घाटन झाले.डॉ. घाळी म्हणाले, ह्यलोकमतह्णने कोरोना महामारीच्या काळात हाती घेतलेला महारक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद व जीवनदायी आहे.प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, महाविद्यालयातर्फे दत्तक घेतलेल्या लिंगनूर काानूल, बेकनाळ, बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ व शिंदेवाडी या गावातही रक्तदान शिबीर घेणार आहोत.लोकमतचे उपसरव्यवस्थापक पाटील म्हणाले, लोकमतच्या महारक्तदान अभियानात ११ दिवसात ३१ हजार पिशव्या रक्तसंकलन झाले आहे. त्याला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता ५१ हजार पिशव्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल.यावेळी लोकमत गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, वितरण अधिकारी धनाजी पाटील व अवधूत पोळ, बातमीदार शिवानंद पाटील, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. संतोष बाबर, प्रा. निलेश शेळके, प्रा. डॉ. दत्ता पाटील, अश्विन गोडघाटे, डॉ. सुभाष पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते. प्रा. अनिल उंदरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास अतिग्रे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटBlood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर