दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By Admin | Updated: June 10, 2016 00:14 IST2016-06-09T23:52:41+5:302016-06-10T00:14:19+5:30

एम. के. गावडे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उपक्रम

Resolution of planting ten thousand trees | दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
एम. के. गावडे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उपक्रम
वेंगुर्ले : कोकणात दहा हजार, तर वेंगुर्लेत २५00 उत्पन्न व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड १ जुलैला जागतिक कृषी दिनापर्यंत करण्याचा संकल्प यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानने केला आहे. प्रतिष्ठानचे कोकण विभागाचे कोषाध्यक्ष एम. के. गावडे यांनी ही माहिती
दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व एम. के. कॉयर फाऊंडेशन यांच्यावतीने वेंगुर्ले कॅम्प येथे नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचे कोषाध्यक्ष एम. के. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा परब, सनराईज
कॉयर क्लस्टरच्या उपाध्यक्षा हेमलता धुरी, काथ्या उद्योजिका समिता देसाई, किस्तालीन फर्नांडिस, पूजा
देसाई, पोलीस पाटील प्रशांत धुरी, हनुमंत धुरी, निखिल धुरी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)



वृक्ष लागवडीचाच पर्याय
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी नारळ, काजू, आंबा, कोकम, बदाम, फणस, आवळा अशी उत्पन्न व सावली देणारी झाडे पर्यावरण दिन ५ जून ते कृषी दिन १ जुलै या कालावधीत लावली जाणार आहेत. सध्या कार्बन क्रेडिटचा विषय व अलनॅनो, ग्लोबल वॉर्मिंगचा विषय ऐरणीवर असल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय आहे.
आज पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हे वारेमाप वृक्षतोड हेच असल्याने पावसाचा थेंब थेंब वाचविण्यासाठी वृक्षलागवड, भूसंधारण, पाणी अडविणे व जिरविणे हे कार्य सामाजिक हेतूने केले पाहिजे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने कोकणात लागवड केली जाणार आहे.
-एम. के. गावडे
कोषाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण, प्रतिष्ठान कोकण विभाग

Web Title: Resolution of planting ten thousand trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.