शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: अवघ्या दीड तासात काढले ८१ जागांचे आरक्षण, १७ पासून हरकती दाखल करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:20 IST

ओबीसीच्या २१ पैकी ११ जागा महिलांना

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया १२ वाजून ३० मिनिटांनी अवघ्या दीड तासात संपवत २० प्रभागांमधील ८१ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाबाबतची प्रक्रिया अधिक सुस्पष्टपणे राबविण्यात आल्यामुळे विनाअडथळा ही प्रक्रिया पार पडली. येत्या १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना आरक्षणाबाबत हरकती दाखल करता येणार आहेत.प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कसबा बावडा येथील शाळा क्रमांक ११ मधील पाच मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड यांनी ही प्रक्रिया राबवली.सुरुवातीला अनुसूचित जातीच्या जागांवरील आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येनुसार ११ प्रभागांतील प्रत्येकी एक जागा ही अनुसूचित जातीसाठी थेट राखीव ठेवण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ४, १८, १७, १३, १५, १, ११, १९, २, ६ व २० या प्रभागांतील एक जागा अनुसूचित जातीसाठी थेट राखीव ठेवले. यामध्ये महिलांसाठीचे सहा जागांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. यात प्रभाग क्रमांक ४, ११, १३, १७, १८ व २० या प्रभागातील प्रत्येकी एका जागेवर अनुसूचित जाती महिलांसाठीची चिठ्ठी निघाल्याने या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या.

आरक्षणानंतरचे चित्र असे :१. सर्वसाधारण गटासाठी ४९ जागा असून, त्यामध्ये २४ महिलांचा समावेश आहे.२. नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण २१ जागांवर जाहीर झाले असून, यामध्ये ११ महिला निवडणुकीच्या रिंगणात असतील.३. अनुसूचित जातीसाठी ११ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात सहा जागांवर महिलांना संधी मिळणार आहे.

असा आहे हरकत, सूचना दाखल करण्याचा कार्यक्रम

  • १७ नोव्हेंबर-आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार
  • १७ ते २४ नोव्हेंबर - आरक्षणाबाबत हरकती, सूचना सादर करता येणार
  • हरकती दाखल करण्याचे ठिकाण - महापालिका (छत्रपती ताराराणी सभागृह)

ओबीसीच्या २१ पैकी ११ जागा महिलांनामहापालिकेच्या २० प्रभागांमध्ये २१ जागा या नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या. प्रभाग क्रमांक २० हा पाचसदस्यीय असल्याने तेथील एक जागा या प्रवर्गासाठी थेट राखीव ठेवली. २१ पैकी ११ जागा महिलांसाठी सोडण्यात आल्या. त्यानंतर महिलांसाठीचे आरक्षण जाहीर केले. ज्या प्रभागात ‘नामाप्र’मधील दोन जागा राखीव आहेत. त्यांतील एक जागा महिलांसाठी थेट राखीव केली. त्यानुसार प्रभाग क्रमांक २० मधील २०-ब ही जागा थेट राखीव केली. शिवाय, ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. मात्र, त्या महिलांसाठी राखीव नाहीत, अशा प्रभागांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या सहा जागा महिलांसाठी थेट राखीव करण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ६, १५, १९ व २० मधील प्रत्येकी एक जागा थेट राखीव केली. याच प्रवर्गामध्ये उर्वरित पाच जागांसाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढली. यात प्रभाग क्रमांक ८, ११, १३, १४ व १८ या प्रभागांमधील जागांवर महिलांचे आरक्षण निघाले.

असे आहे प्रभागनिहाय आरक्षणप्रभाग क्रमांक :  अ  :  ब  :  क : ड१ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागार्स प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) :  सर्वसाधारण२ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागार्स प्रवर्ग (महिला)  : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण ३ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण४ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण५ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण६ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण७ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण८ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण९ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण१० : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) ; सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण११ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण१२ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण१३ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण१४ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण१५ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) :सर्वसाधारण१६ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण१७ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण१८ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण१९ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण२० : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण       :  ई : सर्वसाधारण :  -  :  -  :  महिला 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election: Ward-wise reservation declared in just 90 minutes.

Web Summary : Kolhapur Municipal Corporation swiftly finalized ward reservations for upcoming elections in 90 minutes. The process was smooth, with 81 seats across 20 wards allocated. Objections can be filed November 17-24.