मोबाईल लोकेशनवरून रूद्रचा पोलिसांकडून शोध

By Admin | Updated: September 22, 2015 00:58 IST2015-09-22T00:58:38+5:302015-09-22T00:58:47+5:30

समीर हा गेल्या आठ महिन्यांपासून रूद्रगोंडा पाटील याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचेही समजते

Research from Rudra police on mobile location | मोबाईल लोकेशनवरून रूद्रचा पोलिसांकडून शोध

मोबाईल लोकेशनवरून रूद्रचा पोलिसांकडून शोध

कोल्हापूर : मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरारी असलेला आरोपी रूद्रगोंडा पाटील याच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांची पथके त्याचा माग काढत आहेत. दरम्यान, समीर हा गेल्या आठ महिन्यांपासून रूद्रगोंडा पाटील याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचेही समजते.  मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रूद्रगोंडा पाटील तसेच समीर गायकवाड याचा काही संबंध आहे का, याची कसून चौकशी दिल्लीहून आलेल्या एनआयएच्या पथकाने केली. दरम्यान, रूद्रगोंडाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक, तसेच एसआयटी, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे पथकही वेगवेगळ्या ठिकाणी गेली आहेत. रूद्रगोंडा पाटील याने विविध ठिकाणी वेगवेगळे मोबाईल वापरले असून, त्या मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस त्याचा माग काढत आहेत. कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा गेल्या आठ महिन्यांपासून रूद्रगोंडा पाटील याच्या संपर्कात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. समीरकडे रूद्रगोंडा पाटीलबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने रूद्रगोंडा पाटील याला आपण ओळखत नसल्याचे सांगून तपासकामात असहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Research from Rudra police on mobile location