शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांचे पुनर्सर्वेक्षण करा

By admin | Updated: August 6, 2016 00:21 IST

प्रधानमंत्री योजनेतील अर्जदार : पहिल्या दिवशी ८० हरकतींवर सुनावणी

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असणाऱ्यांच्या ६७५ हरकती अर्जांपैकी शुक्रवारी पहिल्या दिवशी ८० हरकतींवर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात सुनावणी झाली. मंगळवारी (दि. ९) या हरकतींवरील सुनावणीचा अंतिम दिवस आहे. घराऐवजी पर्यायी जागा द्या, झोपडपट्टीमध्ये वास्तव्य आहे; पण सर्वेक्षण यादीमध्ये झोपडपट्टीचे नाव नाही; त्यामुळे यादीचे पुनर्सर्वेक्षण करून झोपडपट्टीचे नाव समाविष्ट करा, अशा स्वरूपाच्या या हरकती होत्या. त्यावर पर्यायी जागेचा विषय हा आपल्या अधिकार क्षेत्रात नाही; त्यामुळे या योजनेशिवाय दुसरीकडे जागा देत येत नसल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. महापालिकेच्या हद्दीत १ जानेवारी २००० पूर्वी व त्यानंतर आजअखेर असलेल्या झोपडपट्टीतील कुटुंबाची यादी १ जुलै ते २५ जुलै २०१६ अखेर हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. शिवाजी मार्केट येथील कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये हरकतींवर शुक्रवारी सुनावणी सुरू झाली. पहिल्या दिवशी ८० जणांच्या हरकती घेण्यात आल्या. या हरकती गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रमांक एक अंतर्गत असलेले फिरंगाई (प्रभाग क्रमांक ४७), (पद्माराजे उद्यान, संभाजीनगर बसस्थानक, नाथा गोळे तालीम, संभाजीनगर, नेहरूनगर, जवाहरनगर प्रभाग) क्रमांक ५५ ते ६० व ६७ ते ७१ प्रभाग क्रमांक (रामानंदनगर-जरगनगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, राजलक्ष्मीनगर, रंकाळा तलाव) व ७३ ते ८१ प्रभाग क्रमांक (फुलेवाडी रिंग रोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर-तुळजाभवानी, साळोखेनगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी-बाबा जरगनगर, सुर्वेनगर, कणेरकर नगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, क्र्रांतिसिंह नाना पाटीलनगर-जीवबा नाना जाधव पार्क) या प्रभागांतील होत्या. दरम्यान, आज, शनिवारी छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागातील हरकतींवर सुनावण्या होणार आहेत. (प्रतिनिधी)अपुरी कागदपत्रेया योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांनी काही शासकीय कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामध्ये झोपडपट्टीचे नाव यादीत नसणे, सर्वेक्षण न झालेल्या झोपडपट्ट्या, अशा शासकीय बाबींचा अभाव तसेच उमेदवारांच्या अपुऱ्या कागदपत्रांचा समावेश होता.