शित्तूर-वारुण येथील ९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:06+5:302021-05-12T04:24:06+5:30
शित्तूर-वारुण : येथील ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अकरा वर्षांची एक मुलगी, तीन स्त्रिया व ...

शित्तूर-वारुण येथील ९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
शित्तूर-वारुण : येथील ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अकरा वर्षांची एक मुलगी, तीन स्त्रिया व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ आहे.
शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात गुरुवार (दि. ०६) रोजी ६३ जणांची अँटिजन टेस्ट न करता थेट आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. दोन दिवसांत येणारा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तांत्रिक अडचणींमुळे आज पाचव्या दिवशी प्राप्त झाला. या पाच दिवसांमध्ये हे ९ कोरोनाबाधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शित्तूर-वारुण गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी घराबाहेर पडू नये. सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर व मास्कचा नियमितपणे वापर करावा, असे आवाहन कोरोना नियंत्रण समिती व आरोग्य प्रशासनाने केले आहे.