शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: निकालावर अहवाल द्या, अपील दाखल करा; राजू गोरेंची मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:30 IST

तपास अधिकाऱ्याला त्रास

कोल्हापूर : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून झालेल्या निकालावरती तत्काळ अहवाल घ्यावा. उच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल करावे, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन आश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना रजिस्टरने सोमवारी पाठविले आहे.त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली. झाल्यापासून सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यापासून कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. निकाल होऊन, शिक्षा होऊन सुमारे एक महिना झाला. मात्र पोलिस आयुक्त कार्यालयाकडून काही मुद्द्यावर पुढील कार्यवाही झालेली नाही. ती तत्काळ करण्यात यावी. उच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल केल्यास आरोपींना कठोर शिक्षा होईल.आरोपींना मदत करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदार संहितेखाली कारवाई करावी. सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यापासून निवृत्तीपर्यंतचा पगार द्यावा. न्यायालयाने निकालपत्रात आणि निकाल देताना माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा पुनश्च जबाब नोंदवून कारवाई करावे, असे म्हटले आहे. त्यानुसार नगराळे याच्यावर कारवाई करावी. आश्विनी यांचा मृत्यू दाखला मिळवून देण्यासाठी मदत करावी.उच्च न्यायालयात खटला लढण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नियुक्ती कायम रहावी. बिद्रे यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या सर्व सवलती अद्याप मिळालेल्या नाहीत. त्या वारसा म्हणून तत्काळ मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत. आरोपींच्या बाबतीत जी अपिले होती, त्याची माहिती किमान चार दिवस आधी आम्हाला कळवावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.

तपास अधिकाऱ्याला त्राससहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्या कुशल तपासामुळे बिद्रे यांना न्याय मिळाला. मात्र या महिला पोलिस अधिकाऱ्याला कसा त्रास होईल, त्यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे, ही बाब निंदनीय आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणCourtन्यायालयPoliceपोलिस